मुंबई : हिमानी बुंदेला या 'कोन बनेगा करोडपती 13' च्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी 1 कोटी रूपयांपर्यंत प्रश्न उत्तरांच्या खेळात मजल मारली आहे. त्यामुळे त्यांचं फार कौतुक होत आहे. कोटी रूपयांसाठी असलेल्या प्रश्नाचं उत्तर दिल्यानंतर त्यांना 7 कोटी रुपयांसाठी प्रश्न विचारण्यात आला. पण त्यांना त्या प्रश्नाचं उत्तर येत नसल्यामुळे त्याचं करोडपती होण्याचं स्वप्न भंगलं. त्यामुळे 1 कोटी रूपये जिंकल्यानंतर हिमानी बुंदेला यांनी शो संपवला. महत्त्वाचं म्हणजे ज्या प्रश्नाने हिमानी बुंदेला यांना करोडपती बनवलं त्या प्रश्नाचं आणि अभिनेत्री राधिका आपटे खास कनेक्शन आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिमानी बुंदेला यांना विचारण्यात आलेला केबीसीचा एक कोटी रूपयांचा प्रश्न दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित होता. दुसऱ्या महायुद्धामध्ये फ्रान्समध्ये ब्रिटनची हेर म्हणून काम करताना नूर इनायत खान हीने कोणतं टोपणनाव वापरलं होतं?, असा प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी त्यांना चार पर्याय देण्यात आले. 


A) वेरा एटकिस, B) क्रिस्टीना स्कारबेक, C) जुलीएन आईस्त्रर, D) जीन-मेरी रेनियर.... या प्रश्नाचं बरोबर उत्तर होतं 'जीन-मेरी रेनियर'... फार विचार करून हिमानी बुंदेला यांनी 1 कोटी रूपये जिंकले.  पण जीन-मेरी रेनियर कोण होत्याआणि त्यांचं राधिका आपटेसोबत काय कनेक्शन आहे. हे  फार कमी लोकांना माहिती आहे. 



राधिकाने साकारली जीन-मेरी रेनियर यांची भूमिका 
दुसऱ्या महायुद्धात जीन-मेरी रेनियर यांनी ब्रिटिश सरकारच्या वतीने गुप्तहेर म्हणून काम केले. या काळात त्यांना एका विशेष मोहिमेचे कार्यकारी म्हणून घोषित करण्यात आले. युनायटेड किंगडममधून फ्रान्सला पाठवण्यात आलेल्या नूर इनायत खान ही पहिली महिला वायरलेस ऑपरेटर होत्या. 


सॅरा मेगनथॉमस दिग्दर्शित नूर इनायत खान यांच्यावर  एक ब्रिटिश चित्रपट 'अ कॉल टू स्पाय' साकारण्यात आला.  ज्यामध्ये राधिकाने नूर इनायत खान यांची  भूमिका साकारली.