मुंबई : बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगच्या नावाची चर्चा फार रंगत आहेत. एकापाठोपाठ एक धमाकेदार चित्रपट घेवून तो चाहत्यांच्या भेटीला येत आहे. 'सिन्बा', 'गली बॉय' अशा एकापेक्षाएक चित्रपटानंतर रणवीरचा '83' चित्रपट चाहत्याचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाला आहे. रणवीरने चित्रपटाचे शूटिंग सुरु केले. कपिल देव यांची व्यक्तिरेखा साकारण्यसाठी तो कपिल देव यांच्याकडून विशेष प्रशिक्षण घेत आहे. कपील देव यांच्यासोबत क्रिकेटचे धडे गिरवत असल्याचे काही फोटो त्याने सोशल मीडियावर पोस्ट केले आहेत. रणवीरने स्वत:च्या ट्विटर अकाउंटवरुन फोटो पोस्ट केले आहेत.



COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'83' चित्रपटामध्ये महान क्रिकेटर कपिल देव यांची यशोगाथा रेखाटण्याचा प्रयत्न केला आहे. चित्रपटात रणवीर सिंग हा कपिल देव यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. 1983 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भरताने दमदार कामगिरी बजावत विश्वचषक भरताच्या नावी केले. 


भारतात क्रिकेटला एक अग्रगण्य स्थान आहे. 1983 साली झालेल्या विश्वचषक स्पर्धेत भारताने पहिल्यादांच आपल्या विजयाचा झेंडा रोवला. '83' सिनेमा हिंदी त्याचबरोबर अन्य भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. सिनेमा हिंदि, तमीळ आणि तेलगु अशा तिन भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. दिग्दर्शक कबीर खान चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहेत.