Spruha Joshi in bollywood movie : लोकप्रिय मराठमोळी अभिनेत्री स्पृहा जोशी ही तिच्या अभिनयासोबतच तिच्या सोशल मीडियामुळे देखील चर्चेत असते. स्पृहानं आजवर फक्त मराठी नाही तर हिंदीमध्ये देखील काम केलं आहे. बॉलिवूड चित्रपटांमध्ये देखील स्पृहा आपल्याला पाहायला मिळाली आहे. स्पृहानं नाटक, मालिका, चित्रपट, वेब सीरिज या चारही माध्यमातून प्रेक्षकांचे मनोरंजन केले आहे. प्रत्येक माध्यामात तिची एक वेगळी प्रतिमा आहे. आता स्पृहानं सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका पोस्टनं सगळ्यांचे लक्ष वेधले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

स्पृहाचा एक बॉलिवूड चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं नाव ‘सब मोह माया है’ असं आहे. स्पृहानं तिच्या या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर शेअर केला आहे. या ट्रेलरमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे की एक मिश्रा कुटुंब आहे. या कुटुंबातील वडिलांची भूमिका अभिनेता अन्नू कपूर साकारत आहेत तर मुलाची भूमिका हा अभिनेता शरमन जोशी साकारत आहे. वडिलांकडे सरकारी नोकरी आहे. त्यांची इच्छा आबे की मुलाकडे देखील सरकारी नोकरी असायला हवी. पण या कुटुंबासमोर अनेक अडथळे निर्माण होतात. तर सरकारी नोकरी मिळवण्यासाठी ते कसे उपाय करतात आणि त्यांच्या अडचणी कशा वाढतात. इतकंच नाही तर सरकारी नोकरी मिळावी म्हणून शरमन जोशी कशा प्रकारे वडिलांच्या निधनाचे नाटक करतो. ट्रेलर पाहून एक गोष्ट कळते की कॉन्सेप्ट नवीन आहे. त्याशिवाय वडील आणि मुलामध्ये असलेलं वेगळं नात आपल्याला यात पाहायला मिळत आहे. 


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


हा ट्रेलर शेअर करत स्पृहानं कॅप्शन दिलं आहे की 'बाप के बदले नौकरी, नौकरी के बदले बाप? कितना भारी पडेगा ये सौद फॉर मिश्रा परिवार'. दरम्यान, या चित्रपटात स्पृहा जोशी ही शरमनच्या पत्नीच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे. स्पृहाच्या या आगामी चित्रपटाचा ट्रेलर पाहिल्यानंतर नेटकऱ्यांनी त्यावर कमेंट करत तिला खूप शुभेच्छा दिल्या आहेत. फक्त नेटकरी नाही तर सेलिब्रिटींनी देखील तिची स्तुती केली आहे. 


हेही वाचा : VIRAL PHOTO : पत्नी, एक्स अन् बहीण सगळ्या एकाच फ्रेममध्ये; ट्रोल्सनी पाडला मीम्सचा पाऊस!


स्पृहाच्या कामाविषयी बोलायचे झाले तर ‘रंगबाज’ आणि ‘द ऑफिस’ या हिंदी सीरिजमध्येही आपल्याला पाहायला मिळाली होती. याशिवाय ‘क्लास ऑफ 83’ आणि ‘अटकन चटकन’ या हिंदी चित्रपटात काम केलं आहे.