मुंबई : फिल्मी स्टार्सचे आयुष्य पडद्यावर कितीही चांगले दिसत असले. तरी त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात अनेक चढउतार येत असतात. जे सहसा कोणत्याही मनुष्याच्या जीवनात कमी येतात. वर्क फ्रंट व्यतिरिक्त, प्रसिद्ध बंगाली अभिनेत्री श्रबंती चॅटर्जी देखील तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल चर्चेत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिसरा संसार ही मोडणार 


श्रबंती चॅटर्जीचे हे तिसरे लग्न होते, जे आता घटस्फोट घेऊन मोडणार आहे. तिने पती रोशन सिंगकडे घटस्फोटासाठी न्यायालयात अर्ज केला आहे. 34 वर्षांची श्रबंती चॅटर्जीने 1997 मध्ये बंगाली चित्रपट 'मयार बँडन' द्वारे पदार्पण केले. आधीच्या चित्रपटाबद्दल बोलायचे झाले तर ती पूर्वी 'लॉकडाउन' चित्रपटात दिसली होती.



अभिनेत्री श्रबंती चॅटर्जीने आतापर्यंत तीन वेळा लग्न केले आहे. 2003 मध्ये तिचे पहिले लग्न चित्रपट निर्माते राजीव कुमार बिस्वास यांच्याशी झाले. पण 2016 मध्ये तिचा राजीवशी घटस्फोट झाला. यानंतर, श्रबंतीने 2016 मध्ये मॉडेल कृष्णा वराजशी लग्न केले, पण हे लग्न देखील फक्त 1 वर्षापेक्षा अधिक टिकले नाही आणि 2017 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. त्यानंतर 2019 मध्ये तिने रोशन सिंगशी लग्न केले.


श्रबंती चॅटर्जीचे पती रोशन सिंग यांनी एका बंगाली पोर्टलशी बोलताना दावा केला आहे की, अभिनेत्री अनेक मित्रांच्या सतत संपर्कात आहे. त्याला समजले आहे की श्रबमति चॅटर्जी लोकांकडे त्याची बदनामी करते आणि रोशन सिंग खूप लठ्ठ असल्याचे सांगते. रोशनच्या मते, श्रबंती तिच्या मित्रांना सांगते की तिचा पती लठ्ठपणामुळे तिच्यासोबत सेक्स करू शकत नाही.'



रोशनने तिच्याकडून 1 कोटी रुपये घेतल्याचं देखील अभिनेत्री सांगते. रोशनने असेही सांगितले आहे की, ती त्याच्या एक्स गर्लफ्रेंडला फोन करते आणि त्यांच्याबद्दल तक्रार करते. दोघांचे नाते टिकेल की नाही या प्रश्नाचे उत्तर काळच देईल. पण रोशन सिंगने अद्याप घटस्फोटाची नोटीस मिळाली नसल्याचं म्हटलं आहे.