मुंबई : एमए थिरुमुगम यांची 'थुनाइवान' सिनेमा हा श्रीदेवीचा पहिला सिनेमा होता, या सिनेमात तिने बालकलाकार म्हणून काम केलं होतं. हा सिनेमा १९६९ साली आला होता. श्रीदेवीचं शनिवारी कार्डियक अरेस्टने निधन झालं. श्रीदेवी दुबईत एका लग्नात असताना ही घटना घडली.


चार वर्षाची असताना अभिनय


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवी चार वर्षाची असताना मोठ्या पडद्यावर बालकलाकार म्हणून झळकली. यानंतर सहा वर्षांनी ती १९७५ मध्ये बॉलीवूडमधील फिल्म जुलीमध्ये दिसली. यानंतर ती एक यशस्वी कलाकार म्हणून पडद्यावर दिसू लागली. 


श्रीदेवीचं या आधीचं नाव अम्मा यंगर अयप्पन


श्रीदेवीचं या आधीचं नाव अम्मा यंगर अयप्पन आहे. पडद्यावर मात्र या अभिनेत्रीचं नाव श्रीदेवी ठेवण्यात आलं. अनिल कपूर आणि जितेंद्र सोबत श्रीदेवीची जोडी यशस्वी ठरलीय जितेंद्रने श्रीदेवीसोबत १६ चित्रपटात काम केलं, त्यापैकी १३ हिट तर ३ फ्लॉप ठरले. 


सदमा हा सिनेमा १९८३ साली रिलीज झाला, या सिनेमात श्रीदेवी सोबत कमल हासनने भूमिका पार पा़डली. सदमा हा सिनेमा तमिळ सिनेमा 'मुंदरम पिराई'चा रिमेक होता.