मुंबई : बॉलीवूडमधील चुलबुली गर्ल अशी अभिनेत्री श्रीदेवी यांची ओळख. त्यांच्या निधनाची बातमी मध्यरात्री आली आणि अख्खं बॉलीवूड हादरलं. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवीच्या निधनाची बातमी तिच्या चाहत्यांसह अनेकांना चटका देवून जाणारी ठरली. अचानक आलेल्या या बातमीमुळे अनेकांना तर या गोष्टीवर विश्वासच बसत नव्हता. दुबईमध्ये नातेवाईकांच्या लग्नसोहळ्यासाठी गेलेली असताना हार्ट अॅटॅकने श्रीदेवीचे निधन झाले. 


त्यांची मोठ्या पडद्यावरुन एक्झिट झाली मात्र आपल्या मुलीचे मोठ्या पडद्यावरील पदार्पण पाहण्याआधीच. श्रीदेवीची मुलगी जान्हवी कपूर 'धडक' या सिनेमातून बॉलीवूडमध्ये पदार्पण करतेय. मात्र आपल्या मुलीची मोठ्या पडद्यावरील एंट्री पाहणं श्रीदेवी यांच्या नशिबातचं नव्हते. काही दिवसांपूर्वीच धडक या सिनेमातील पोस्टर लाँच झाले होते.