मुंबई : बाहुबली चित्रपटामध्ये शिवगामीची भूमिका करण्यासाठी श्रीदेवीला विचारणा झाली होती पण तिनं प्रमाणाबाहेर मानधन आणि मागण्या केल्याचा गौप्यस्फोट दिग्दर्शक राजमौलींनी केला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शिवगामीच्या भूमिकेसाठी श्रीदेवीनं ८ कोटी रुपये मागतिले होते. एवढच नाही तर हैदराबादला प्रत्येक वेळी शूटिंगला जाण्यासाठी पाच बिझनेस क्लासची तिकीटं, हैदराबादमधील सगळ्यात मोठ्या हॉटेलमध्ये पाच बिझनेस सुट्स आणि बाहुबलीच्या हिंदी आवृत्तीत तिनं शेअरही मागितला होता, असं राजमौली म्हणालेत.


राजमौलींनी केलेल्या या आरोपांमुळे श्रीदेवी चांगलीच भडकली आहे. कलाकारानं केलेल्या मागण्या सार्वजनिक करण्याचा अधिकार कोणत्याही दिग्दर्शकाला नसल्याचं श्रीदेवी म्हणाली आहे. अशाप्रकारे व्यायसायिक गुप्त गोष्टी उघड करणं चुकीचं आहे. याआधीही माझ्या मागण्या मान्य न झाल्यामुळे मी चित्रपट नाकारले आणि ते हिट झाले, अशी प्रतिक्रिया श्रीदेवीनं दिली आहे.