Srivdevi English Vinglish: श्रीदेवी बॉलिवूडची पहिली लेडी सुपरस्टार. आज भलेही त्या आपल्यासोबत नसल्या तरी त्यांचे चित्रपट आजही मोठ्या आवडीने पाहिले जातात. त्यांचा अभिनय, चित्रपट, त्यातील गाणी आजही प्रेक्षकांच्या आठवणीत आहे. श्रीदेवीच्या चित्रपटांबाबत बोलायचे झालं तर त्यांचा इंग्लिश विंग्लिश चित्रपटाचे नाव आवर्जुन घ्यायलाच पाहिजे. 2012मध्ये आलेला हा चित्रपट थिएटरमध्ये प्रचंड गाजला. श्रीदेवी यांचा कमबॅक म्हणून हा सिनेमा हिटदेखील ठरला. मात्र या सिनेमासाठी श्रीदेवी ह्या पहिली पसंत नव्हत्या.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रीदेवी यांचा इंग्लिश विंग्लिश हा चित्रपट खूप जास्त हिट ठरला होता. 2012मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात एक महिला अमेरिकेत इंग्रजी शिकण्याचा प्रयत्न करते. तिच्या कुटुंबात तिला सन्मान मिळवण्यासाठी इंग्रजी शिकण्यास सुरुवात करते. मात्र त्यातही तिला अनेकदा अडथळ्यांचा सामना करावा लागतो. मात्र, त्यावर मात करत ती इंग्रजी शिकते आणि सगळ्यांना आश्चर्यचकित करते. या चित्रपटात श्रीदेवी यांनी केलेल्या अभिनयाचे खूप कौतुक झाले होते. हा चित्रपट श्रीदेवी यांना कसा मिळाला? जाणून घेऊया. 


इंग्लिश विंग्लिश जेव्हा चित्रपटगृहात आला तेव्हा अनेकांनी श्रीदेवी यांचे कौतुक केले. या चित्रपटाबाबत श्रीदेवी यांचे पती आणि चित्रपट निर्माता बोनी कपूर यांनी अलीकडेच या चित्रपटाबाबत गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी म्हटलं आहे की, चित्रपटाचे दिग्दर्शक गौरी शिंदे यांना ऐश्वर्या रॉय यांना या चित्रपटासाठी कास्ट करायचे होते. मात्र, चित्रपटाचे निर्माते आर बाल्की यांना श्रीदेवी यांनाच चित्रपटात काम करावे, अशी इच्छा होती. त्यांना हा चित्रपट अनेक भाषांमध्ये आणायचा होता. 


जेव्हा बोनी कपूर यांनी आर बाल्की यांना विचारले की त्यांना फक्त लोकल लँग्वेजमध्येच हा चित्रपट का प्रदर्शित करायचा आहे. तेव्हा त्यांनी म्हटलं की, हिंदी व्हर्जनसाठी श्रीदेवी एकदम फिट राहिल. कारण इंग्रजी न येण्याचा अभिनय करणे इतके सोप्पे नाहीये आणि श्रीदेवीच या पात्राला न्याय देऊ शकतील. 


बोनी कपूर यांनी पुढे म्हटलं आहे की, ऐश्वर्या राय बच्चन या मिस इंडिया आहेत. मात्र इंग्लिश विंग्लिशसाठी श्रीदेवी फरफेक्ट होत्या. त्यामुळं ऐश्वर्या राय यांच्याऐवजी श्रीदेवी यांना चित्रपटात कास्ट करण्यात आले. त्यांनीही खूप मन लावून ही भूमिका साकारली होती.