Entertainment News : बॉलिवूडमध्ये 1 कोटी रुपये मानधन घेणारी ती पहिली अभिनेत्री आहे. हे ऐकल्यावर तुम्हाला वाटलं असेल, आम्ही रेखा, माधुरी, करीना, प्रियांका, दीपिका आणि आलिया बद्दल बोलतोय.. पण नाही आम्ही एका अभिनेत्रीबद्दल बोलतोय ती आजही प्रत्येक चाहत्याचा आणि भारतीयांच्या हृदयात राज्य करत आहे. वयाच्या चौथ्या वर्षी तिने सिनेसृष्टीत पाऊल ठेवलं. चुणचुणी व्यक्तीरेखाची ही अभिनेत्री प्रत्येकाला आवडू लागली. दक्षिणेच्या चारही भाषांशिवाय तिने हिंदी चित्रपटसृष्टीवरही तब्बल 50 वर्षे राज्य केलं, असं म्हणं वावग ठरणार नाही. आता तुम्हाला उत्सुकता लागली असेल ही अभिनेत्री आहे तरी कोण? (Sridevi was the first Bollywood actress to charge Rs 1 crore for one of her film sridevi birth anniversary and janhavi kapoor)


ही अभिनेत्री आहे तरी कोण?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ही अभिनेत्री आज आपल्यामध्ये नाही. तिचं खरं नाव होतं अम्मा येंगर अयप्पन पण तिला आपण ओळखतो ते श्रीदेवी या नावाने. हो श्रीदेवी त्याकाळात एका चित्रपटासाठी 1 कोटींचं मानधन घ्यायची. बॉलिवूडची हवा हवाई गर्ल श्रीदेवीचा (Sridevi Birth Anniversary) 13 ऑगस्ट 1963 ला तामिळनाडूतील मीनमपट्टी या छोट्याशा गावात जन्म झाला. 



श्रीदेवीने (Sridevi Birth Anniversary) 1979 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'सिक्स्टीन सावन' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये आगमन केलं. मात्र हा सिनेमा फ्लॉप ठरला. पण त्यानंतर 1983 मध्ये आलेला हिम्मतवाला या चित्रपटातून श्रीदेवीने (Sridevi) दमदार आगमन केलं. मग काय श्रीदेवीने मागे वळून पाहिले नाही एकापेक्षा एक हिट चित्रपटाचा तिने सपाटा लावला. तिने आपल्या फिल्मी करिअरमध्ये 300 चित्रपटांमध्ये काम केलं. 


त्याकाळात अभिनेते हे सर्वात श्रेष्ठ होते तेव्हा श्रीदेवीने (Sridevi) आपली वेगळी ओळख बनवली आणि चित्रपट हे अभिनेत्रींमुळे चालतात हे सिद्ध केलं. एका मीडिया रिपोर्टनुसार या कारणामुळे त्या काळात श्रीदेवी (Sridevi) या एकमेव अभिनेत्री होत्या ज्या एक कोटी रुपये मानधन घ्यायच्या. 




मीडिया रिपोर्ट्सनुसार, श्रीदेवीचे (Sridevi) स्टारडम इतकं होते की एकेकाळी तिच्या यशाने दंबग सलमान खान देखील थरथर कापायचा. एका मुलाखतीत सलमानने स्वत: याचा खुलासा केला होता. तो म्हणाला होता की, श्रीदेवीसोबत काम करताना मी नर्व्हस व्हायचो. शिवाय जर त्याने श्रीदेवीसोबत काम केलं तर त्याच्या कामाची कोणीही दखल घेणार नाही, सर्वांच्या नजरा फक्त श्रीदेवीवरच (Sridevi) राहतील, असं त्याने या मुलाखतीत सांगितलं होतं. पण सलमानने श्रीदेवीसोबत'चंद्रमुखी' आणि 'चांद का तुकडा' या चित्रपटात स्क्रीन शेअर केली आहे. 



काही काळासाठी श्रीदेवी चित्रपटसृष्टीपासून दूर गेली होती. 15 वर्षांच्या ब्रेकनंतर 2013 मध्ये इंग्लिश विंग्लिश या चित्रपटातून श्रीदेवीने आपली जादू कायम असल्याचं दाखवून दिलं. त्यानंतर 2018 मध्ये मॉम चित्रपटातील त्यांना भूमिकेने चाहत्यांचं मनं जिंकल. वयाच्या 54 व्या वर्षांपर्यंत श्रीदेवी यांनी 300 कोटींची संपत्ती जमा केली. 3 आलिशान घरं, 7 गाड्या आणि लक्स, तनिष्काची ब्रँड अॅम्बेसेडर होते. पण 24 फेब्रुवारी 2018 ला श्रीदेवीने जगाचा निरोप घेतला आणि बॉलिवूडसह भारतीयांना धक्का बसला. श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मोठी मुलगी जान्हवी कपूर आज बॉलिवूडमध्ये लोकप्रिय अभिनेत्री आहे.