मुंबई : बॉलिवूडची पहिली महिला सुपरस्टार श्रीदेवी यांचे दुबईत निधन झाले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वयाच्या 54 व्या वर्षी टबबाथमध्ये बुडून श्रीदेवींचा मृत्यू झाल्याने त्यांच्या चाहत्यांना आणि बॉलिवूडला धक्का बसला आहे.  


चैन्नईत अस्थिविसर्जन 


दुबईत 24 फेब्रुवारीला श्रीदेवींचे निधन झाले. त्यानंतर 72 तासांनी श्रीदेवींचे पार्थिव शरीर मुंबईत आणण्यात आले. विलेपार्ले येथील हिंदू स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. 


अंत्यसंस्कारानंतर श्रीदेवींच्या अस्थीचे विसर्जन चैन्नईतील रामेश्वरम येथे होणार आहे. अस्थिविसर्जनासाठी श्रीदेवींचे पती बोनी कपूर कुटुंबियांसह आज चैन्नईत दाखल होणार आहेत अशी माहिती काही मीडिया रिपोर्टमधून पुढे आली आहे.  


जान्हवी आणि खुशीला सांभाळणं हेच माझं प्राधान्य - बोनी कपूर 


श्रीदेवी आमच्या जगण्याच्या, हसण्याच्या कारण होत्या. तिच्या शिवाय पुढे कसं जायचं ? हा प्रश्न आहे. पण जान्हवी आणि खुशीला सांभाळणं हीच माझ्यापुढील आत्ता महत्त्वाची गोष्ट आहे असे बोनी कपूर यांनी म्हटले आहे.