श्रीदेवींचं पार्थिव भारतात आणण्यासाठीचा मार्ग मोकळा
बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवीचं पार्थिव आज संध्याकाळी पर्यंत भारतात आणलं जाईल.
मुंबई : बॉलिवूडची सुपरस्टार श्रीदेवीचं पार्थिव आज संध्याकाळी पर्यंत भारतात आणलं जाईल.
भारतीय दुतावास आणि कपूर कुटुंबियांना पत्र सोपवण्यात आलं आहे. त्यामुळे पार्थिव भारतात आणण्यासाठीचे सर्व मार्ग आता मोकळे झाले आहेत.
दुबई फॉरेंसिक टीम आणि पोलिसांनी सगळे रिपोर्ट्स सरकारी वकिलांना सोपवले आहेत. ऑटोप्सी रिपोर्ट आल्यानंतर श्रीदेवी यांच्या मृत्यूबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. श्रीदेवी यांचं पार्थिव दुपारी 3.30 पर्यंत मुंबईकडे रवाना होऊ शकतं.
सरकारी वकील संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया झाल्यानंतर आता कपूर कुटुंबियांना पार्थिव सोपवणार आहे. त्यानंतर पार्थिवावर रासायिनक लेप लावला जाईल. यासाठी जवळपास 1.30 तास लागतो. त्यामुळे पार्थिवाला मुंबईला येण्यासाठी संध्याकाळ होऊ शकते.