मुंबई : हवाहवाई असलेली अभिनेत्री श्रीदेवी ही सर्वांचीच लाडकी. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘मॉम’ या चित्रपटात स्वत:इतकाच आकर्षक अभिनय करणारी श्रीदेवी खास आहे. अनुराग बासूने आयोजित केलेल्या सरस्वती पूजेला पोहोचली. या पूजेला सगले स्टार सेलिब्रिटी उपस्थित होते. पण साऱ्यांचे लक्ष मात्र श्रीदेवीकडे रोखले गेले.  कारणही तसेच होते. यावेळी श्रीदेवी बरीच बदलेली दिसली. केवळ बदललेलीच नाही श्रीदेवी चक्क ओठ लपवतांनाही दिसली. होय, श्रीदेवीचे ओठ सुजलेले दिसले. हेच सुजलेल्या ओठ श्रीदेवी लपवतांना दिसली.


 श्रीदेवीने  कधीचीच  वयाची पन्नाशी ओलांडलीय. पण आजही तिच्या वयापेक्षा ती बरीच तरूण दिसते. तरूण दिसण्यासाठी श्रीदेवीने प्लास्टिक सर्जरी केल्याचे मानले जाते. अलीकडे एका इव्हेंटमध्ये श्रीदेवीला याबद्दल थेट प्रश्न विचारला गेला होता. अर्थातच श्रीदेवीने प्लास्टिक सर्जरी चर्चा अफवा असल्याचे सांगितले होते. 


मी आधीपासूनच तरूण दिसते. लोकांना इतक्यात माझे तरूण दिसणे जाणवू लागलेय. कारण अलीकडे मी बाहेर पडू लागलेय. मनाची शांती आणि आनंद हे माझ्या तरूण दिसण्याचे रहस्य आहे. मी अतिशय शिस्तबद्ध आयुष्य जगत आलेय. 
आजही मी रोज कडक डाएट फॉलो करते. न चुकता पॉवर योगा करते. आठवड्यातले चार दिवस टेनिस खेळते. जंक फूड, गोड पदार्थ मी अजिबात खात नाही. हे सगळे माझ्या चेहऱ्यावर दिसते, असे ती म्हणाली होती.