मुंबई : अल्लू अर्जुन आज त्याचा 40 वा वाढदिवस साजरा करत असून त्याचे चाहते त्याला खूप शुभेच्छा देत आहेत. दरम्यान, पुष्पाची को-स्टार रश्मिका मंदान्ना हिनेही त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. अल्लू अर्जुनसोबतचा ब्लॅक अँड व्हाइट फोटो शेअर करत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की, 'हॅपी बर्थडे @alluarjun... माझ्या पुष्पा..


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

जग तुमच्यावर आधीपासूनच प्रेम करत आहे, मात्र मला आशा आहे की, या वाढदिवशी जगाच्या कानाकोपऱ्यातील लोकं तुमच्यावर प्रेम करतील. तुमच्यासाठी फक्त प्रेम आणि तारीफ सर.. तुम्हाला खूप प्रेम पाठवत आहे. अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना सुकुमारच्या पुष्पा: द राइजमध्ये दिसले होते. डिसेंबरमध्ये प्रदर्शित झालेला हा चित्रपट सुपरहिट ठरला होता.


रश्मिका मंदान्ना हिने देखील या आठवड्यात तिचा वाढदिवस साजरा केला आणि अलीकडेच तिने तलपती विजयसोबत एका चित्रपटाची घोषणा केली आहे. रश्मिका मंदान्ना आणि साऊथ स्टार विजय या दोघांनी एकत्र चित्रपट साईन केल्याची अनेक दिवसांपासून बातमी होती.



रश्मिकाने याबद्दल लिहिलं आहे की, तुमच्यापैकी बरेच जण मला विचारत आहेत की मी विजय सर आणि ऍटली सरांच्या चित्रपटाचा भाग आहे का? मला आशा आहे की, मला लवकरच त्यांच्यासोबत काम करण्याची संधी मिळेल. तुम्हा सर्वांचा असा पाठिंबा पाहून मी भारावून गेले आहे. मी त्याच्यासोबत लवकरच काम करणार आहे. मी तुम्हा सर्वांवर खूप प्रेम करते.