गौरी खानला सतावतेय मुलगा अबराम खानची चिंता; या` सवयीमुळे शाहरुखची पत्नी हैराण
हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan)चा धाकटा नवाब अबराम खान हा सर्वात लोकप्रिय स्टार किड आहे.
मुंबई : हिंदी चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार शाहरुख खान (Shah Rukh Khan)चा धाकटा नवाब अबराम खान हा सर्वात लोकप्रिय स्टार किड आहे. घरातील सर्वात लहान असल्याने अबराम आई गौरी खान (Gauri Khan) सह त्याचा भाऊ आर्यन आणि सुहाना यांचाही तो आवडता आहे. दरम्यान, गौरी खानने सांगितलं की, ती अबराम खान (Abram Khan)च्या एका सवयीमुळे खूप नाराज आहे आणि त्यामुळे तिला दररोज याची भीती वाटते. अबरामच्या कोणत्या सवयीमुळे गौरीला त्रास होतो. जाणून घेऊया.
अबराम खानच्या या सवयीने गौरी खानला होतोय त्रास
अलीकडेच शाहरुख खानची बायको गौरी खान चित्रपट निर्माता करण जोहरच्या प्रसिद्ध शो कॉफी विथ करणमध्ये सहभागी होण्यासाठी आली होती. यादरम्यान गौरीने किंग खान आणि तिच्या मुलांबद्दल अनेक खुलासे केले. गौरी खान तिच्या कूल स्टाइलसाठी प्रसिद्ध आहे. तसंच कुटुंब आणि मुलांशी कसं वागायचं हे गौरीला चांगलंच माहीत आहे. दरम्यान, गौरी खानने कर्ली टेल्सला दिलेल्या मुलाखतीत अबराम खानबद्दल खूप काही सांगितलं आहे. (SRK Son Abram Gauri Khan is troubled by this habit of Abram Khan this fear is haunting him everyday)
खरे तर गौरीने सांगितलं आहे की, आमच्या कुटुंबात जर कोणी सर्वात जास्त फूडी असेल तर तो अबराम खान आहे. अबरामला माझ्यासारखंच चांगले पदार्थ खायला आवडतात. याच कारणामुळे अबराम दिवसेंदिवस लठ्ठ होत चालला आहे. अबरामच्या वाढत्या वजनामुळे आमची चिंता वाढली आहे. त्यामुळे आम्हाला त्याच्याकडे विशेष लक्ष देण्याची गरज आहे.
गौरीला जेवणाची आवड आहे
अबराम खानसोबतच गौरी खाननेही खुलासा केला आहे की, तिलाही खाण्याची खूप आवड आहे. आपल्या खाण्याच्या सवयीबद्दल बोलताना गौरी खानने सांगितलं आहे की, मी मुंबईतला वडा पाव, दिल्लीची भेळ पूरी, गोव्याची कोळंबी कढी आणि कोलकाताची पुच्का खाण्याची खूप आवड आहे.आमच्या घरात अबराम आणि मी अशी दोन माणसं आहोत ज्यांना बाहेरचं खायला खूप आवडतं.