मुंबई : बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्या प्रकरणात एक मोठा खुलासा झाला आहे. १४ जूनच्या दिवशी सुशांतच्या आत्महत्येनंतर त्याचा मृतदेह खाली उतरवताना नेमकं काय झालं? याबाबत स्वतः ऍम्ब्युलन्स चालकाची दिलेली माहिती अतिशय धक्कादायक आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

ऍम्ब्युलन्सचे मालक राहुल यांनी झी न्यूजला दिलेल्या माहितीनुसार, १४ जून रोजी सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली. त्या दिवशी ते गावी होते. त्यामुळे त्यांचा भाऊ अक्षय ऍम्ब्युलन्स घेऊन सुशांतच्या घरी गेले. 


अक्षय यांनी पाहिलं की, सुशांतच्या आत्महत्येनंतर त्यांचा मृतदेह सीलिंगवरून काढून खाली बेडवर ठेवण्यात आला होता. ज्यानंतर ऍम्ब्युलन्समधील कर्मचारीने सुशांत सिंहचा मृतदेह स्ट्रेचरवर घेऊन इमारती खाली आणण्यात आलं. 


राहुलने पुढे दिलेल्या माहितीनुसार, ऍम्ब्युलन्सच्या व्हीलचेअरमध्ये काही तरी बिघाड आल्यामुळे सुशांतचा मृतदेह यामध्ये नीट प्रकारे राहत नव्हता. त्यामुळे तेथे दुसरी ऍम्ब्युलन्स पाठवण्यात आली. तेथे फाऊल प्ले सारखा प्रकार घडला का? असं विचारण्यात आलं. त्यावेळी राहुल यांनी ही गोष्ट नाकारली.   


सुशांतचे वडील के.के. सिंह यांनी रिया चक्रवर्तीविरोधात एफआयआर दाखल केल्यानंतर तिवारी यांच्या नेतृत्त्वाखाली मुंबईत बिहार पोलीसांचं पथक या प्रकरणाच्या तपासासाठी दाखल झालं. सूत्रांच्या माहितीनुसार सध्याच्या घडीला मुंबईत आलेल्या सर्व बिहार पोलिसांना महानगरपालिका होम क्वारंटाईन करण्याच्या बेतात आहेत. पण, अद्यापही कोणा एका अज्ञात स्थळी असल्यामुळं बिहार पोलिसांच्या वास्तव्याचं ठिकाण मात्र कळू शकलेलं नाही.