मुंबई : तैमूरची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

असं असलं तरीही शाहिद कपूर आणि मिरा राजपूतच्या मुलीने मिशाने तैमूरला मागे टाकलं आहे. तैमूरला स्टार किड्सच्या यादीत अव्वल आहे.  तैमूरची एक झलक टिपण्यासाठी मीडियाचे कॅमेरे नेहमी तयारच असतात. मात्र आता तैमूरला टफ द्यायला मिशा सज्ज झाली आहे.  तैमूर आणि मीशाचे फोटो रोजच सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. त्याच्या आई-वडिलांप्रमाणे ते ही स्टार बनले आहेत असे म्हटले तर वावगे ठरणार नाही.   


कोणती ऑफर?    


मिड-डेच्या दिलेल्या माहितीनुसार रिपोर्टनुसार मीशाची वाढती लोकप्रियता बघून तिला एक लहान मुलांच्या ब्रँडने अॅडमध्ये घेण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र शाहिदने ही अॅडची ऑफर नाकारली आहे. मिड-डेच्या रिपोर्टनुसार, जेव्हा मीराकडे ही ऑफर आली तेव्हा ती खूप उत्साहित होती. शाहिदला कदाचित वाटले असेल मीशाला ऐवढ्या लहान वयात कॅमेरासमोर आणून तिचे बालपण हिरावून घेतल्यासारखे होईल म्हणून त्यांने ही ऑफर नाकारली असेल.    


काय म्हणाला ? 


नुकत्याच एका इंटरव्ह्रु दरम्यान बोलताना शाहिद म्हणाला होता की, मीशाला त्याला मीडियाच्या कॅमेऱ्यापासून दूर ठेवायचे आहे. तिला बिचारीला माहिती ही नाही तिचे फोटो का काढले जातायेत. शाहिद सध्या त्याचा आगामी चित्रपट 'बत्ती गुल मीटर चालू’ चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. उत्तराखंडमध्ये या चित्रपटाचे शूटिंग सुरु आहे. आपल्या वाढदिवसासाठी शूटिंगमधून वेळ काढून शाहिद मुंबईत आला आहे. 'बत्ती गुल मीटर चालू’ हा चित्रपट वीज चोरीवर आधारित आहे.