मुंबई : बॉलिवूडची दिग्गज अभिनेत्री श्रीदेवींची मुलगी जान्हवी कपूर आणि अभिनेता शाहीद कपूरचा भाऊ ईशान खट्टरचा धडक सिनेमा नुकताच प्रदर्शित झाला. जान्हवीने या सिनेमाद्वारे बॉलिवूडमध्ये पर्दापण केले. आता जान्हवीनंतर हे स्टार किड्स बॉलिवूड डेब्यूसाठी सज्ज आहेत. पाहुया कोणते आहेत हे स्टार किड्स...


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

बॉलिवूड अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडे देखील बॉलिवूड डेब्यूच्या तयारीत आहे. 'स्टूडेंट ऑफ द ईयर 2' सिनेमातून अभिनेता टायगर श्रॉफ सोबत ती बॉलिवूडमध्ये पर्दापण करेल.


या यादीत सुनील शेट्टीचा मुलगा अहान शेट्टीचेही नाव आहे. साजिद नाडियावाला यांच्या आगामी सिनेमात अहान शेट्टी लवकरच झळकेल. 



मैंने प्यार किया या सिनेमातून प्रसिद्धीझोतात आलेली अभिनेत्री भाग्यश्रीचा मुलगा अभिमन्यु दसानी देखील 'मर्द को दर्द नहीं होता' या सिनेमातून बॉलिवूडमध्ये डेब्यू करेल.



सुपरस्टार सनी देओलचा मुलगा करण देओल देखील बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्याच्या तयारीत आहे. 'पल पल दिल के पास' या सिनेमात प्रमुख भूमिकेत करण देओल दिसेल. विशेष म्हणजे हा सिनेमा खुद्द सनी देओल दिग्दर्शित करत आहे.



अभिनेता सैफ अली खानची मुलगी सारा अली खान सिम्बा सिनेमातून बॉलिवूडमध्ये पर्दापण करण्यासाठी सज्ज झाली आहे. या सिनेमात रणवीर सिंग प्रमुख भूमिकेत आहे. रोहीत शेट्टी दिग्दर्शन करत असलेल्या या सिनेमाचे शूटिंग सुरु झाले आहे.