मुंबई :  कोरोना व्हायरसा धोका दिवसागणिक वाढताना दिसत आहे. आता कोरोना व्हायरसमुळे हॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता काळाच्या पडद्या आड गेला आहे. 'स्टार वॉर्स' फेम अँड्र्यू जॅक यांचा करोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे. ते  ७६ वर्षांचे होते. मंगळवारी सर्रे रुग्णालयात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समजले होते. त्याना उपचारा दरम्यान त्यांना कोणत्याही प्रकारचा त्रास झाला नव्हता. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

‘स्टार वॉर्स’ चित्रपटांच्या सीरिजमध्ये तोड भूमिका साकारणाऱ्या अँड्र्यू जॅक यांचा एजंट जिल मॅक्लोने त्यांच्या निधनाची माहिती प्रसारमाध्यमांना दिली. 'अँड्र्यू जॅक हे थेम्स नदीवरील एका हाऊसबोटमध्ये वास्तव्यास होते. त्यांचं त्यांच्या पत्नीवर नितांत प्रेम होते. ते डायलेक्ट कोचसुद्धा होते.' अशी  माहिती त्यांच्या एजंटने दिली. 



शिवाय त्यांच्या पत्नीने देखील ट्विटरवर एक पोस्ट शेअर केली आहे. 'अँड्र्यू जॅकला दोन दिवसांपूर्वी कोरोनाची लागण झाली होती. पण या दरम्यान त्यांना वेदना झाल्या नव्हत्या.' अशा भावना त्यांची पत्नी गॅब्रिएल रॉजर्स यांनी व्यक्त केल्या आहेत  


कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जगाचे मोठे नुकसान झाले आहे. या धोकादायक विषाणूची लागण  संपूर्ण जगात तब्बल ८ लाख ५८ हजार ८९२ जणांना झाली आहे. तर ४२ हजार १५८ जाणांचा या व्हायरसने बळी घेतला आहे. दिलासादायक बातमी म्हणजे १ लाख ७८ हजार १०० कोरोना बाधित रुग्णांची या आजारातून सुखरूप सुटका झाली आहे.