मुंबई : 'पीएम मोदी' चित्रपट गेल्या काही दिवसांपासून भलताच वादाच्या भोवऱ्यात अडकला होता. अखेर सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगाने सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाकडून सर्व याचिका फेटाळण्यात आल्यानंतर, चित्रपटाच्या प्रदर्शनाची जबाबदारी निवडणूक आयोगाकडे सोपवली गेली होती. लोकसभा निवडणुकीनंतर चित्रपट प्रदर्शित करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाकडून घेण्यात आला आहे. निवडणूक आयोगाच्या या निर्णयाचा फायदा येत्या काळात प्रदर्शित होणाऱ्या चित्रपटांना होण्याची शक्यता आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

निवडणूक आयोगाने चित्रपटाला स्थगिती दिल्याचा फायदा अभिनेता जॉन अब्राहमच्या 'रॉ' चित्रपटाला होण्याची शक्यता आहे. 'रॉ' प्रदर्शित झाल्यानंतर बॉक्स ऑफिसवर आपला जोर धरताना दिसत आहे. चित्रपटाने आतापर्यंत २८ कोटी रूपयांचा गल्ला जमा केला आहे. १७ एप्रिलला मेगाबजेट 'कलंक' चित्रपट रूपेरी पडद्यावर दाखल होणार आहे. 


याशिवाय खिलाड़ी अभिनेता अक्षय कुमारच्या 'केसरी' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १०० कोटींच्यावर गल्ला जमा केला आहे. हा चित्रपट १५० कोटींचा आकडा पार करण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. 'पीएम मोदी' चित्रपटाला स्थगिती दिल्याचा फायदा कोणत्या चित्रपटाला अधिक होईल हे पाहाणे औत्सुक्याचं ठरणार आहे.