डिप्रेशनमध्ये गेला होता `स्त्री 2`मधील `हा` अभिनेता, नंतर खलनायकाने चमकवले त्याचे नशीब
हॉरर-कॉमेडी चित्रपट `स्त्री 2` या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. मात्र, `स्त्री 2` मधील अभिनेता काही काळापूर्वी डिप्रेशनमध्ये गेला होता. काय होते कारण? कोण आहे तो अभिनेता? जाणून घ्या सविस्तर
Stree 2 : बॉलिवूड अभिनेता अभिषेक बॅनर्जी त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. सध्या तो 'स्त्री 2' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. 'स्त्री 2' मध्ये अभिषेकने पुन्हा एकदा जनाचे पात्र साकारून प्रभावित केले आहे. अभिनेत्याने सांगितले की 2018 मध्ये 'स्त्री' प्रदर्शित झाल्यानंतर तो स्टिरियोटाइप झाला होता. कलाकारांना एकाच प्रकारच्या भूमिका मिळत होत्या. त्यामुळे तो डिप्रेशनचा बळी देखील ठरला होता. त्यानंतर अभिनेत्याला एक अशी भूमिका मिळाली की त्याचे नाव प्रेक्षकांच्या ओठावर रुजले.
एका मुलाखतीदरम्यान अभिनेत्याने 'स्त्री' नंतर त्याला कोणत्या भूमिका मिळत आहे याबद्दल त्याने सांगितले आहे. तो म्हणाला की, जनाची भूमिका केल्यानंतर मला मुर्ख पात्रं मिळत होती. मी रंगीबेरंगी आणि चमकदार कपडे घालावेत आणि त्याच शैलीत संवाद बोलावेत अशी प्रत्येकाची इच्छा होती. जना केवळ एक पात्र आहे. ती माझ्या खूप जवळ असली तरी देखील खऱ्या आयुष्यात मी तसा अजिबात नाही. त्यानंतर अभिषेक बॅनर्जीने 'ड्रीम गर्ल' आणि 'बाला'मध्ये मी काम केले. सगळ्यांना वाटायला लागलं की मी कॉमिक अभिनेता आहे.
पाताळ लोक पात्रातून लोकप्रियता
अभिनेता पुढे म्हणाला की, कोविडच्या काळात मी खूप उदास होतो. मला वाटले की आता मला यापेक्षा वेगळ्या प्रकारची भूमिका कोणीही देणार नाही. मग मला 'पाताळ लोक' या वेब सिरीज मिळाली. सुदीप शर्मा यांना धन्यवाद की त्यांनी मला 'हथौड़ा त्यागी'च्या भूमिकेत माझी कल्पना केली. अभिषेक म्हणाला की, जना हा त्यांच्यासाठी मोठा ब्रेक होता. पण 'पाताळ लोक' या पात्राने त्याला मोठ्या प्रमाणात लोकप्रियता मिळवून दिली.
मी प्रत्येक प्रकारची भूमिका करू शकतो
अभिषेक बॅनर्जी पुढे म्हणाला की, मला इंडस्ट्रीतून 'अरे तू अभिनेता आहेस' असे फोन येऊ लागले. तुम्ही हे करु शकता, पण हथोडा त्यागीनंतर मला सायको रोल मिळू लागले. पण आता लढा आहे मी सामान्य भूमिकाही करू शकतो हे सिद्ध करण्याचा. मी नाटक, रोमान्स आणि इतर कोणत्याही प्रकारच्या भूमिका करू शकतो. मी खूप हट्टी आहे. 'स्त्री 2' सोबतच चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झालेल्या 'वेदा' या चित्रपटात अभिनेत्याने खलनायकाची भूमिका साकारल्याची माहिती आहे.