Devara Box Office Collection: श्रद्धा कपूरच्या `स्त्री 2`ची OTT वर रिलीजनंतरही कोट्यवधींची कमाई; `देवरा`ला देतोय टफ
Devara Box Office Collection: ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतरही `स्त्री`नं बॉक्स ऑफिसवर केली कोटींची कमाई तर `देवरा`च्या कमाईच्या आकड्यानं सगळ्यांना झालं आश्चर्य
Devara Box Office Collection: गेल्या बऱ्याच दिवसांपासून थिएटरमध्ये एकामागे एक चित्रपट हे प्रदर्शित होत आहेत. नुकताच ज्युनियर एनटीआरचा देवरा पार्ट वन हा चित्रपट थिएटरमध्ये प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटानं पहिल्या बॉक्स ऑफिसवर खूप चांगली कमाई केली आहे. मात्र, दुसऱ्या दिवशी त्याच्या कलेक्शनमध्ये 53 टक्के घट झाली. तर 'स्त्री 2' अजूनही चित्रपटगृहांमध्ये खूप चांगली कमाई करत आहे. चला तर जाणून घेऊया या दोन्ही चित्रपटांनी रविवारी किती कलेक्शन केलं.
देवरामध्ये ज्युनियर एनटीआरच्या अभिनयाला त्यांचे सगळे चाहते पसंत करत आहेत. चित्रपटात त्यांनी डबल रोल साकारला आहे. कोरटाला शिवा यांनी दिग्दर्शित केलेल्या या चित्रपटात सैफ अली खान आणि जान्हवी कपूरच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. चित्रपटाच्या कलेक्शनविषयी बोलायचे झाले तर पहिल्या दिवशी 82.5 कोटींची कमाई केली. खरंतर हा चित्रपट दुसऱ्या दिवशी बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करेल अशी अपेक्षा असताना त्यात दुसऱ्या दिवशी 53 टक्के घट झाली आणि चित्रपटानं फक्त 38.2 कोटींची कमाई केली. सध्या समोर आलेल्या आकड्यांवरून हे समोर आलं आहे की रविवारी या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर काही खास कामगिरी केलेली नाही. तिसऱ्या दिवशी या चित्रपटानं 40.3 कोटींचं कलेक्शन केलं. त्यासोबत चित्रपटानं एकूण कमाई की 161 कोटींची कमाई केली. तर देवरानं ओपनिंग वीकेंडला जगभरात 250 कोटींची कमाई केली आहे.
हेही वाचा : 500 रुपयाच्या नोटेवर गांधीजींऐवजी अनुपम खेर यांचा फोटो! पाहताच धक्का, अभिनेते म्हणतात...
श्रद्धा कपूर आणि राजकुमार रावचा चित्रपट 'स्त्री 2' बॉक्स ऑफिसवर आता चांगली कमाई करत आहे. प्रदर्शनानंतर या चित्रपटानं आतापर्यंत रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आहे. शाहरुख खानच्या जवान या चित्रपटाला मागे टाकल्यानंतर आता या चित्रपटानं 600 कोटींच्या क्लबमध्ये स्वत: चं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. 45 व्या दिवशी 'स्त्री 2' नं बॉक्स ऑफिसवर 2.10 कोटींचं बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केलं. तर सध्याच्या समोर आलेल्या आकड्यांनुसार, 46 व्या दिवशी या चित्रपटानं 2.65 कोटींचं बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केलं. त्यासोबत चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे 588.25 कोटी झालं.