Stree 2 Box Office: श्रद्धा कपूर आणि राजकुमार राव यांच्या 'स्त्री 2' चित्रपटाचा वेग रोखणे सध्या इतर चित्रपटांना कठीण झालं आहे. 15 ऑगस्ट रोजी बॉक्स ऑफिसवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने एक महिना बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला आहे. हा चित्रपट अमर कौशिक दिग्दर्शित आहे. कमाईच्या बाबतीत या चित्रपटाने निर्मात्यांना निराश केले नाही. दररोज 'स्त्री 2' चित्रपटाच्या कलेक्शनमध्ये वाढ होत आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'स्त्री 2' या चित्रपटाने 31 दिवसांमध्ये चांगले कलेक्शन केले आहे. सध्या हा चित्रपट 600 कोटींच्या क्लबमध्ये सामील होण्याच्या शर्यतीत आहे. आज 'स्त्री 2' चित्रपटाला रिलीज होऊन एक महिना झाला आहे. अशा परिस्थितीत आता चित्रपटाचे शनिवारचे आकडे समोर आले आहेत. 


31 व्या दिवशी 'स्त्री 2' चित्रपटाचे किती कमाई? 


'स्त्री 2' चित्रपटाच्या बॉक्स ऑफिस कलेक्शनवर नजर टाकली तर, वीकेंडमध्ये या चित्रपटाला प्रचंड यश मिळाले आहे. हा चित्रपट प्रत्येक वीकेंडला चांगली कमाई करताना दिसत आहे. राजकुमार राव आणि श्रद्धा कपूर व्यतिरिक्त या चित्रपटामध्ये पंकज त्रिपाठी, अभिषेक बॅनर्जी आणि अपारशक्ती खुराना यांच्या अभिनयानेही चाहत्यांची मने जिंकली आहेत. 



पहिल्या दिवशी 'स्त्री 2' चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर 51.8 कोटी रुपयांची कमाई केली होती. एवढेच नाही तर 'स्त्री 2' चित्रपटाने 'बाहुबली 2', 'पठाण', 'टाइगर जिंदा है' आणि 'गदर 2' सारख्या अनेक मोठ्या चित्रपटांना देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर मागे टाकले आहे.


लवकरच स्त्री 2 600 कोटींचा आकडा गाठणार


रिपोर्टनुसार, 'स्त्री 2' चित्रपटाने 31 व्या दिवशी 5.25 कोटी रुपयांची कमाई केली आहे. चित्रपटाच्या एकूण कलेक्शनबद्दल बोलायचे झाले तर या चित्रपटाने आतापर्यंत देशभरात 547.95 कोटी रुपयांची कमाई केली आहे. या वींकेडला देखील चित्रपट चांगली कमाई करेल अशी अपेक्षा आहे.