Stree 2 Twitter Review : स्त्री आणि सरकटाने थरकाप उडवला, स्टार कलाकारांच्या सरप्राईज एंट्रीने चाहत्यांना सुखद धक्का
Stree 2 Twitter Review : श्रद्धा कपूरचा `स्त्री 2` पाहताच प्रेक्षकांनी दिली अशी प्रतिक्रिया...
Stree 2 Twitter Review : बॉलिवूड अभिनेत्री श्रद्धा कपूरचा 'स्त्री 2' हा चित्रपट आज 15 ऑगस्ट रोजी प्रदर्शित झाला आहे. या निमित्तानं पुन्हा एकदा 'स्त्री' अर्थात श्रद्धा कपूर, राजकुमार राव, अभिषेक बनर्जी आणि पंकज त्रिपाठी पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'स्त्री' च्या पहिल्या भागातून स्त्रीची भीती आणि तिची दहशत पाहायला मिळाली. कशी ती चंदेरी गावातील पुरुषांना पळवून लावते. मात्र, आता सरकटेची दहशत पाहायला मिळत आहे. 'स्त्री 2' ची पटकथा आणि कॉमेडी कशी वाटली याची माहिती आता प्रेक्षकांनी सोशल मीडियावर दिली आहे. चला तर जाणून घेऊया...
ज्यांनी 'स्त्री 2' पाहिला त्यांनी या चित्रपटाला सोशल मीडियावर ब्लॉकबस्टर म्हटलं आहे. इतकंच नाही तर असं चित्रपट बनवावे असं देखील त्यांनी सांगितलं. मात्र, सगळ्यात जास्त धक्कादायक तेव्हा होतं जेव्हा 'स्त्री 2' मध्ये अभिनेता अक्षय कुमार दिसला. त्यानं चाहते देखील हैरान झाले आहेत.
एका नेटकऱ्यांनं त्या पोस्टमध्ये अक्षयचा चित्रपटातील एका सीनचा व्हिडीओ शेअर केला आहे. त्यासोबत त्यानं त्याला कॅप्शन दिलं की 'अक्षय कुमार हा 'स्त्री 2' च्या विश्वातील थायनॉस असणार आहे.' दुसरा नेटकऱ्यानं 'या चित्रपटाला 4 स्टार दिले असून या वर्षातील सगळ्यात बेस्ट चित्रपट आहे आणि इतकंच नाही तर पहिल्या चित्रपटापेक्षा या भागात जास्त भीती वाटेल. हॉरर चित्रपट आणि कॉमेडीचं खूप सुंदर असं उदाहरण पाहायला मिळत आहे. त्याशिवाय अनपेक्षित पाहुण्या कलाकारांची एन्ट्री.' तिसरा नेटकरी म्हणाला, 'अप्रतिम चित्रपट आहे. साडेचार स्टार. श्रद्धानं दिमाखदार अभिनय केला आहे. अक्षय कुमारच्या एन्ट्रीनंतर मज्जा ही दुप्पट आली. आताच हा चित्रपट हाऊसफूल होतोय.' अक्षय कुमार शिवाय या चित्रपटात आणखी कोणत्या कलाकाराची पाहुण्या कलाकाराची भूमिका असेल तर ती आहे वरुण धवनची. वरुन धवनला पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत पाहून सगळ्यांना आश्चर्य झाले. त्यामुळे आता असं म्हटलं जात आहे की 'स्त्री 2' आणि वरुण धवनच्या 'भेडिया'चं काही कनेक्शन आहे.'
हेही वाचा : 'या' अभिनेत्रीमुळे राज कपूर यांच्या वैवाहिक नात्यात आला होता दुरावा! नवरा खरेदी करण्याचा झाला होता आरोप
या चित्रपटाचं बजेट हे 25 कोटी असल्याचं म्हटलं जातं. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे अमर कौशिक यांनी केले आहे.