मुंबई : पुष्पा सिनेमाने लोकांच्या मनावर राज्य केलं आहे. याच्या डायलॉगपासून ते, कलाकार आणि गाण्यांपर्यंत सगळ्याच गोष्टीची लोकांना भूरळ पडली आहे. ज्यामुळे सोशल मीडियावर देखील बरेच लोक याच्या डागलॉगने, स्टाईलने आणि गाण्याच्या स्टेपला कॉपी करत आहेत. पुष्पा हा असा सिनेमा आहे, ज्याने सगळे रेकॉर्ड मोडले आहेत आणि अवघ्या कमी वेळेत फार प्रसिद्धी मिळाली आहे. आतापर्यंत क्वचितच असा कोणा व्यक्ती असेल ज्याने पुष्पा सिनेमा पाहिला नसेल.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तसेच तुम्ही सामंथाचा ऊ अंतवा, अल्लूचा श्रीवल्ली किंवा रश्मीकाचा सामी सामी तुम्ही युट्यूबर देखील पाहिलं असेल. तसेच अनेक लोकांनी या गाण्यावरती रिल्स बनवलेले देखील तुम्ही पाहिले असेल. एवढंच काय तर या सिनेमातील डायलॉग आणि स्टाईलचीही कॉपी करताना तुम्ही अनेक लोकांना पाहिलं असेल.


यासगळ्यामध्ये अल्लु अर्जुनच्या एका स्टाईलला लोकांनी फार पसंत केले आहे. यामध्ये अल्लू अर्जुन आपल्या हनुवटीकडे हात ठेऊन ते तो दाढीकडे घासतो. त्यानंतर रवींद्र जडेजापासून डेव्हिड वॉर्नरपर्यंत सगळ्याच लोकांनी त्याची ही स्टाईल कॉपी केली आहे.


परंतु तुम्हाला माहिती आहे का? की ती अल्लू अर्जुनची स्टाईल नसुन साई पल्लवीची आहे. तिने सगळ्यात पहिल्यांदा अशी स्टाईल राऊडी बेबी या सुप्रसिद्ध गाण्यामध्ये वापरली होती. या गाण्यात तिने धनुषसोबत डान्स केला आहे. त्यामुळे अनेक चाहत्यांचा असा दावा आहे की, जी स्टाईल लोकं कॉपी करतायत ती स्टाईल अल्लु अर्जुनची नाही.


अल्लू अर्जुनची शैली सगळ्यांनाच आवडते. केवळ पुष्पा: द राइजच नाही तर आर्यापासून आणि विशेषत: आर्या 2 नंतर सगळेच लोकं त्याच्यावर प्रेम करु लागले आहेत आणि त्याची लोक प्रियता वाढली आहे.



त्याला कूल अभिनेता म्हणून देखील ओळखले जाते. अल्लुची दाढी घासण्याची पद्धत विशेषतः वेगळी आहे. अलीकडेच एका मुलाखतीत, अल्लू अर्जुनने खुलासा केला की, एकदा तो अशी काही तरी पद्धत करत होता, तेव्हा दिग्दर्शक सुकुमार यांना ही पद्धत इतकी आवडली की त्यांनी अल्लू अर्जुनला ते व्यक्तिरेखेच्या वैशिष्ट्यांपैकी एक म्हणून समाविष्ट करण्याची सूचना केली. ज्यानंतर आपल्या सगळ्यांना हे माहित आहे की, ती स्टाईल किती फेमस झाली.


परंतु ही स्टाईल साई पल्लवीने प्रथम राउडी बेबीमध्ये केली आहे. हे गाणे तिने धनुषसोबत शुट केले होते. राउडी बेबी हे मारी 2 (2018) चित्रपटातील एक गाणे आहे, जे आजच्या काळातील ऊ अंतावासारखे चार्टबस्टर ठरले. तुम्ही चित्रपट पाहिला नसेल, पण गाणे नक्कीच ऐकले असेल ना? धनुष आणि साई पल्लवी काही इलेक्ट्रिक डान्स मूव्ह देतात, ज्यामुळे त्यांच्यासोबत किंवा त्यांच्यासारखे नाचणे अशक्य होते. 


आता, यामध्ये कोणी चांगली स्टाईल केली कोणी खराब केली या वादात न जाता. या माहितीला मनोरंजक गोष्टीच्या स्वरुपात घ्या.