Chinmay Mandlekar In Subhedar: दिग्दर्शक दिग्पाल लांजेकर यांचा 'सुभेदार' हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सुभेदार (Subhedar Movie) या चित्रपटाची टीम सध्या या चित्रपटाचं प्रमोशन करत आहे. दोन दिवसांपूर्वी सुभेदार या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीस आला. या ट्रेलरला नेटकऱ्यांची चांगलीच पसंती मिळाल्याचं दिसून आलंय. त्याला कारण म्हणजे, दोन दिवसात या ट्रेलरला दोन मिलियनपेक्षा जास्त व्ह्यूज मिळाले आहेत. त्यामुळे चित्रपट हीट ठरणार यात काही शंका नाही. अभिनेते अजय पुरकर (Ajay Purkar) हे सुभेदार या चित्रपटात तानाजी मालुसरे यांची भूमिका साकारणार आहेत. तर चिन्मय मांडलेकर (Chinmay Mandlekar) हा छत्रपती शिवाजी महाराज यांची ( Chhatrapti Shivaji Maharaj) भूमिकेत असेल. अशातच आता चिन्मय मांडलेकर याने केलेलं वक्तव्य ऐकून तुम्हाला गर्व वाटल्याशिवाय राहणार नाही. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

'सुभेदार' हा (Subhedar Movie) चित्रपट 18 ऑगस्ट रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. या चित्रपटाची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. अशातच चिन्मय मांडलेकर याने चित्रपटाच्या सिनेमाच्या गमतीजमती सांगितल्या. त्यावेळी त्याने सिनेमा शूट करत असताना कोणते नियम पाळता? असा सवाल विचारला गेला.


पंतप्रधानांना देखील सेल्फी देणार नाही...


जेव्हा मी शिवाजी महाराजांच्या पोशाखात असताना, पूर्ण पोशाखात म्हणजे मी जेव्हा जीरेटोप चढवतो. त्यानंतर माझा एकही सेल्फी कोणासोबतही मिळणार नाही. अगदी देशाचा पंतप्रधान जरी आला तरी मी सेल्फी काढून देणार नाही. याचं कारण असं आहे की, मी जेव्हा पूर्ण पोशाख घातलो, तेव्हा मी छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत असतो आणि मला असं वाटतं की तो मान राखला गेला पाहिजे. त्यामुळे आतपर्यंत मी त्या पोशाखात कोणालाही सेल्फी दिली नाही. माझ्या या निर्णयामुळे बऱ्याच लोकांचा हिरमोड होतो. तेव्हा मी त्यांना सांगतो, माझी तळमळ समजून घ्या, पण तुम्हाला सेल्फी नाही मिळणार. एकदा का तुम्ही त्या भूमिकेत गेलात की तुम्ही कसे वागता? त्यावेळी तुमच्या सहकालाकारां बरोबर तुमचं आचरण कसं असतं? त्यामुळे तुम्हाला सर्व गोष्टींचं भान बाळगावं लागतं. त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांचा पोशाख घातला, तेव्हा त्यांचा आव राखला गेला पाहिजे, असं चिन्मय मांडलेकरने (Chinmay Mandlekar) म्हटलं आहे.



दरम्यान, सुभेदार या सिनेमामध्ये चिन्मय मांडलेकर, अजय पुरकर, स्मिता शेवाळे, मृण्मयी देशपांडे, अभिजीत श्वेतचंद्र, शिवानी रांगोळे, विराजस कुलकर्णी, समीर धर्माधिकारी, उमा सरदेशमुख, अर्णव पेंढारकर, आस्ताद काळे हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत असणार आहेत.