`सुशांतच्या आत्महत्येहवर तीनही खान शांत का?`, स्वामींचा निशाणा
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये होत असलेल्या भेदभावाबाबत अनेक आरोप आणि टीका केल्या जात आहेत.
मुंबई : अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या आत्महत्येनंतर बॉलीवूडमध्ये होत असलेल्या भेदभावाबाबत अनेक आरोप आणि टीका केल्या जात आहेत. सुशांतच्या आत्महत्येहवरुन आता भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी शाहरुख खान, सलमान खान आणि आमीर खान यांच्यावर निशाणा साधला आहे. सोबतच स्वामी यांनी या तिघांवर गंभीर आरोप केले आहेत.
सुशांतच्या आत्महत्येप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी अभिनेत्री रुपा गांगुली आणि अभिनेते शेखर सुमन यांनी केली आहे. या मुद्द्यावर आता सुब्रमण्यम स्वामींनीही प्रतिक्रिया दिली आहे. स्वामींनी सलमान खान, शाहरुख खान आणि आमीर खानच्या गप्प बसण्यावर प्रश्न उपस्थित केला आहे.
राज्यसभा खासदार असलेल्या सुब्रमण्यम स्वामी यांनी तिन्ही खानवर आरोप केले आहेत. भारत आणि परदेशात विशेष करुन दुबईमध्ये तिन्ही खाननी जमवलेल्या संपत्तीच्या चौकशीची गरज आहे, अशी मागणी स्वामी यांनी केली. त्यांना बंगले आणि संपत्ती गिफ्ट म्हणून कोणी दिली? आणि त्यांनी ती विकत कशी घेतली? या सगळ्याची ईडीची एसआयटी, आयटी, सीबीआयने चौकशी करण्याची गरज आहे. हे सगळे कायद्यापेक्षा मोठे आहेत का? असं ट्विट सुब्रमण्यम स्वामींनी केलं आहे.