मुंबई : बॉलिवूडमध्ये असे अनेक अभिनेते आहेत, ज्यांना फार कमी कालावधीत  यश मिळालं. 2003 साली 'हजारों ख्वाहिशें ऐसी' चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर अनेकांना वाटलं की बॉलिवूडला अणखी एक नवीन चेहरा मिळाला आणि त्या अभिनेत्याचं नाव होतं शायनी अहूजा (Shiney Ahuja).  'हजारों ख्वाहिशें ऐसी'  शायनीला फिल्मफेयर सर्वोत्कृष्ट पुरुष पदार्पण हा अवॉर्ड देखील मिळाला. पण मोलकरणीच्या एका आरोपामुळे शायनीच्या करियरला पूर्णविराम लागला. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

15 मे 1975 रोजी जन्मलेल्या शायनी आहुजाने मॉडेलिंगच्या क्षेत्रातून कारकिर्दीला सुरुवात केली.  त्याला त्याच्या पहिल्या  'हजारों ख्वाहिशें ऐसी' चित्रपटातून प्रचंड लोकप्रियता मिळाली. त्यानंतर शायनीने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलिवूडला दिले आणि स्वतःची एक वेगळी जागा चाहत्यांच्या मनात तयार केली. पण त्याची ही लोकप्रियता फार काळ टिकू शकली नाही. 



2009 साली शायनीच्या मोलकरणीने त्यांच्यावर बलात्काराचा आरोप केला. तेव्हा संपूर्ण देशात याप्रकरणी चर्चा रंगली होती. याप्रकरणी शायनीला  7 वर्षांची शिक्षा देखील सुनावण्यात आली. पण 2011 साली शयानीची जामिनावर सुटका झाली. भूतकाळातील सर्व गोष्टी विसरून त्याने 2012 साली 'घोस्ट' चित्रपटाच्या माध्यमातून पुन्हा पदार्पण केलं. पण तेव्हा तो चाहत्यांचं मनोरंजन करण्यात अपयशी ठरला.