मुंबई : बॉलीवूडचं चमकणारं जग कोणाला आवडत नाही? नशीब आजमावण्यासाठी रोज अनेक लोक मायानगरीत येत असतात. असेच अनेक सिनेस्टार देखील याच यादित येतात. जे मायानगरीत येतात आणि आपलं नशिबच बदलून टाकतात. यामधलंच एक नाव म्हणजे शरद केळकर. लक्ष्मी बॉम्ब आणि तान्हाजी यांसारख्या ताकदिच्या चित्रपटांमध्ये जबरदस्त काम करणारा अभिनेता शरद केळकरची कथाही अशीच काहीशी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मनातील गोष्टी उघडपणे सांगितल्या
प्रत्येक कलाकार कधी चांगलं तर कधी वाईट काम करत असतो. पण त्याच्यामागची धडपड कोणालाच दिसत नाही. एका मुलाखतीमध्ये शरद केळकरने आपली सक्सेस स्टोरी सांगितली आहे. एका मुलाखतीमध्ये अनेक गोष्टींचा खुलासा करत मनमोकळेपणाने सर्वांसमोर आपलं वक्तव्य मांडलं होतं. 


यामागील कथा कोणालाच माहीत नाही
एका मुलाखतीमध्ये शरद केळकर म्हणाला, 'आता लोकांना वाटतं की, माझ्याकडे गाडी आहे. चांगले कपडे घालून केस- चेहरा चकचकीत बनवून येतो. 'काम पाहून लोक शहरात काम देतात, ते चांगले किंवा वाईट असू शकतं. पण त्याच्या मागची धडपड कुणालाच दिसत नाही. चित्रपटांमध्ये येण्यापूर्वी शरद जिम ट्रेनर होता. 'शरदने सुरुवातीच्या काळात आर्थिक समस्यांचा सामना केला आहे.


शरदच्या आयुष्यात एक वेळ अशी आली होती जेव्हा त्याच्या क्रेडिट कार्ड्समध्ये पैसे नव्हते. त्याचा बँक बॅलन्स झिरो होता. त्यावेळी त्याच्यावर अनेक जबाबदाऱ्या होत्या. त्याच्यावर कर्जाचा डोंगर होता आणि याचवेळी त्याची क्रेडिट कार्डची मर्यादाही संपली होती. 


शरदने असंही उघड केलं की त्याला बोबडा बोलण्याचा त्रास होता. आणि म्हणूनच तो शाळेत देखील दांडी मारायचा कारण त्याच्या आजूबाजूची इतर मुलं त्याची चेष्टा करायचे. नाराज असूनही त्याने आपल्या इच्छाशक्तीवर कधीही या सगळ्याचा परिणाम होऊ दिला नाही आणि आपल्या उणिवांवर मात करण्यासाठी प्रयत्न सुरू केले.


शरद केळकर आता एक यशस्वी अभिनेता तसेच सुप्रसिद्ध डबिंग कलाकार आहेत. लहानपणी ज्याला बोबडा बोलण्याचा त्रास होता शरदने 'बाहुबली'च्या हिंदी व्हर्जनसाठी प्रभाससाठी डब केलं. याबद्दल बोलताना शरद म्हणाला मी आता अशा व्यवसायात काम करतो जिथे मला माझं बोलणं आणि आवाजाचं कौशल्य वापरावं लागतं.', आणि मला आनंद आहे की, आज मी एक यशस्वी डब आर्टिस्टदेखील आहे. 


सिंदूर तेरे नाम का आणि कुछ तो लोग कहेंगे यांसारख्या टीव्ही शोमध्ये देखील शरद दिसला आहे. टीव्हीमध्ये यशस्वी कारकिर्दीचा आनंद घेतल्यानंतर, तो बॉलीवूडमध्ये गेला. रॉकी हँडसम, हलचल, 1920 रिटर्न्स, राम लीला आणि लक्ष्मी यांसारख्या चित्रपटांमधील अभिनयासाठी त्याचं कौतुक केलं गेलं. नुकताच शरद केळकर 'भुज: द प्राईड ऑफ इंडिया'मध्ये एक महत्त्वाची भूमिका साकारताना दिसला होता. संजय दत्त, सोनाक्षी सिन्हा आणि नोरा फतेही सह-अभिनेता असलेला Disney+Hotstar प्रदर्शित झाला होता.