सुधा मूर्तींनी सांगितलं; एक यशस्वी स्त्री होण्यासाठी काय हवं, ‘त्याशिवाय शक्यच नाही!’
Sudha Murthy on The Vaccine War: सध्या चर्चा आहे ती म्हणजे विवेक अग्निहोत्री यांच्या `द व्हॅक्सिन वॉर` या चित्रपटाची. हा चित्रपट सध्या सर्वत्र गाजतो आहे. ज्येष्ठ लेखिका सुधा मुर्ती यांनीही हा चित्रपट पाहिला आहे. यावेळी त्यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं प्रेक्षकांना प्रेरणा मिळेल असं काहीसं महत्त्वाचं सांगितलं आहे. चला पाहुया त्या नक्की काय म्हणाल्या आहेत.
Sudha Murthy on The Vaccine War: सध्या चर्चा आहे ती म्हणजे 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाची. काही दिवसांपुर्वी या चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चच्या निमित्तानं सेलिब्रेटींची मांदियाळी पाहायला मिळाली होती. यावेळी एकाच मंचावर विवेक अग्निहोत्री, पल्लवी जोशी, नाना पाटेकर, गिरीजा ओक अशी मातब्बर मंडळी उपस्थित होती. या चित्रपटाची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा रंगलेली आहे. पहिल्यांदा या चित्रपटाचे पोस्टर व्हायरल झाले होते. त्यानंतर काही दिवसातच या चित्रपटाचा ट्रेलरही लॉन्च झाला आहे. ज्याची जोरात चर्चाही रंगलेली पाहायला मिळाली होती. 2022 मध्ये 'द काश्मिर फाईल्स' हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. ज्याची सोशल मीडियावर चांगलीच चर्चा रंगलेली होती. हा विवेक अग्निहोत्री यांचा सिनेमा प्रचंड गाजला होता. त्यामुळे त्यांची बरीच चर्चा रंगलेली होती. आता या चित्रपटाचा दुसरा भागही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. त्यात आता चर्चा आहे ती म्हणजे विवेक अग्निहोत्री यांच्या 'द व्हॅक्सिन वॉर' या चित्रपटाची.
यावेळी हा चित्रपट पाहण्यासाठी ज्येष्ठ लेखिका सुधा मुर्ती यांनी हजेरी लावली होती. यावेळी त्यांनी या चित्रपटाच्या निमित्तानं आपल्या सर्वांना प्रेरणादायी गोष्टी सांगितल्या आहेत. या चित्रपटातून स्त्रियांच्या कर्तृत्वाचे दर्शन घडताना दिसते आहे. यावेळी त्या या चित्रपटाविषयी बोलताना म्हणाल्या की,''मला स्त्रीची भूमिका समजते कारण ती एक आई आहे. ती एक पत्नी आहे आणि ती एक करिअर करू इच्छिणारी व्यक्ती आहे. आपलं कुटुंब आणि आपलं काम या दोन्ही गोष्टींचा समतोल साधणं खूप कठीण आहे पण काही लोकं ही फारच भाग्यवान असतात. माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर माझे आईवडिल वरच्या मजल्यावर राहायचे आणि मी खालच्या. त्यामुळे मी चांगलं काम करू शकले.'' असं त्या म्हणाल्या.
हेही वाचा : देव आनंद यांचा मुंबईतला बंगला खरंच 400 कोटींना विकला? पुतण्या संतापला, म्हणाला, 'हे वृत्त...'
त्या पुढे म्हणाल्या की, ''मुलं झाल्यानंतर महिलांसाठी करिअर करणं सोपं नसतं. तिला कुटुंबाचा चांगला आधार लागतो. त्यामुळेच मी नेहमी म्हणते की प्रत्येक यशस्वी स्त्रीच्या मागे एक समजूतदार पुरुष असतो. नाहीतर ती हे करू शकत नाही.''
या चित्रपटाचेही त्यांनी भरभरून कौतुक करत आहेत. त्या म्हणाल्या की, '''कोव्हॅक्सिन' म्हणजे काय हे सामान्य माणसाला समजणार नाही… पण हा चित्रपट ते काय याचा समजवून देण्यासाठी यशस्वी प्रयत्न दाखवतो. ते फक्त काम नाही, ते या सर्व शास्त्रज्ञांनी केलेले निस्वार्थ कार्य आहे. त्यांनी या कालावधीत जास्तीत जास्त वेळ लस निर्मितीत घालवला जेणेकरून आपण सर्वजण आनंदाने आणि निरोगीपणे जगू शकू. हा एक अतिशय महत्त्वाचा संदेश आहे.''
यालाच धरून त्या पुढे म्हणाल्या की, ''आमच्याकडे प्रचंड क्षमता आहे परंतु ती दिसून येत नाही कारण ‘आम्ही ते करू शकणार नाही’ अशी आम्हाला नेहमीच काळजी राहून लागलेली असते पण आपण ते करू शकतो. हा संदेश या चित्रपटात आहे. केवळ वैद्यकीय क्षेत्रातच नाही तर कोणत्याही क्षेत्रात आपण अशक्य गोष्टी करू शकतो. आपण स्वतःवर विश्वास ठेवला पाहिजे. सौंदर्य कपड्यांमध्ये किंवा मेकअपमध्ये नसते तर ते आपल्यात असलेल्या धैर्य आणि आत्मविश्वासात आहे. आपला आत्मविश्वास हीच खरी संपत्ती असल्याचे हा चित्रपट सांगतो. त्यामुळे सर्व भारतीयांनो, तुमची क्षमता दाखवा. मेहनती व्हा आणि तुम्ही भारतीय आहात याचा अभिमान बाळगा'', असं सुधा मुर्ती म्हणाल्या.