देव आनंद यांचा मुंबईतला बंगला खरंच 400 कोटींना विकला? पुतण्या संतापला, म्हणाला, 'हे वृत्त...'

Dev Anand Bunglow: सध्या चर्चा आहे ती म्हणजे ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांच्या 73 वर्षे जुन्या बंगल्याची. हा बंगला विकला जाणार असून त्याजागी टोलेजंग 22 मजली इमारत बांधली जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आले होते आता त्यावर त्यांच्या पुतण्यानं स्पष्टीकरण दिलं आहे. 

गायत्री हसबनीस | Updated: Sep 20, 2023, 02:51 PM IST
देव आनंद यांचा मुंबईतला बंगला खरंच 400 कोटींना विकला? पुतण्या संतापला, म्हणाला, 'हे वृत्त...' title=
dev anand 73 year old bunglow will not be sold and will not bulid 22 storey building says ketan anand

Dev Anand Bunglow: कालपासून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगलेली पाहायला मिळाली आणि ती होती दिवंगत ज्येष्ठ अभिनेते देव आनंद यांच्या जुन्या घराची. त्यांचे 73 वर्षे जूनं घरं हे विकलं जाणार आहे आणि त्याजागी मोठा 22 मजल्यांचा टॉवर बांधला जाणार असल्याची जोरात चर्चा रंगलेली होती. त्यावर आता त्यांच्या घरातील एका महत्त्वाच्या सदस्याकडून स्पष्टीकरण आलं आहे. कालपासून समोर आलेल्या माहितीनुसार असं कळतं होतं की हा बंगला 400 कोटींच्या आसपास विकला जाणार आहे.

त्यामुळे त्यांच्या या घराची जोरात चर्चा रंगलेली होती. एका रिपोर्टनुसार असं कळतं होतं की या बंगल्याचे डील झाले होते आणि यासाठी देवानंद यांच्या मुलांचीही त्याला परवानगी होती. परंतु आता समोर आलेल्या माहितीनुसार आता हा बंगला विकला जाणार नसून, अशीही कोणतीही डील झाली नाही आणि या बंगल्याच्या जागी 22 मजली इमारतही बांधली जाणार नाही अशी माहिती देव आनंद यांच्या पुतण्यानं सांगितले आहे. 

ई-टाईम्सच्या रिपोर्टनुसार, देव आनंद यांचा भाऊ चेतन त्याचा मुलगा केतन आनंद यांनी मात्र यावर आता स्पष्टीकरण दिलं आहे आणि अशाप्रकारे कुठल्याही रिअल इस्टेट डेव्हलम्पेंट कंपनीशी चर्चा झाली नसून अशाप्रकारे काहीच वाटाघाटी झाल्या नसल्याचे ते म्हणाले आहेत. केतन आनंद हे स्वत: एक चित्रपट दिग्दर्शक - निर्माते आहेत. या बातमी ते म्हणाले की, ही बातमी खोटी आहे. मी देविना आणि परिवाराशी बोललो आहे.

हेही वाचा : …जेव्हा जया भादुरीला डेट करायचे बिग बी, मला पण घेऊन जायचे; ज्येष्ठ अभिनेत्रीने सांगितला किस्सा

देवानंद यांनी त्यांच्या या जुहूच्या बंगल्यात 40 वर्ष वास्तव केले होते. ते या बंगल्यात त्यांची पत्नी कल्पना कार्तिक आणि दोन मुलं देविना आनंद आणि सुनील आनंद यांच्यासोबत राहायचे. हा बंगला 350-400 कोटी रूपयांना विकला जाईल अशी कालपासून चर्चा सुरू झाली आहे. असंही समोर आलं होतं की या घराची काळजी कोणीच घेत नव्हते म्हणून हा बंगला विकला जाणार आहे. 2011 साली देव आनंद यांचे निधन झाले. त्यानंतर हा घरात तसं पाहिलं तर कोणीच राहत नव्हते. देव आनंद यांची मुलगी देवीना हे उटीला आपल्या आईसह वास्तव्याला आहे. तर त्यांचा मुलगा हा अमेरिकेत वास्तवाला आहे.