ही आहे शाहरुखच्या लेकिची गर्ल गँग; पूल पार्टीतील `तो` व्हिडीओ होतोय व्हायरल...
सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूर हे त्रिकूट बॉलिवूड स्टारकिड्समध्ये सगळ्यात हॉट आहेत.
मुंबई : सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूर हे त्रिकूट बॉलिवूड स्टारकिड्समध्ये सगळ्यात हॉट आहेत. या तिघी येत्या दिवसांत कधी पार्टीला तर कधी शॉपिंगला एकत्र जाताना दिसतात. नुकत्याच या तिघी BFF पूल पार्टीमध्ये चिल करताना दिसल्या होत्या. तिघींनी पूलमध्ये मस्ती करताना एक व्हिडिओ देखील बनवला होता. आणि काही फोटोदेखील क्लिक केले होते. या पार्टीतले काही INSIDE PHOTOS आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत.
बिकीनी परिधान करुन बनल्या जलपरी
या पूल पार्टीचा व्हिडिओ आणि फोटो सवत: अनन्या पांडेने शेअर केले आहेत. सुहाना खान, अनन्या पांडे आणि शनाया कपूरला या व्हिडिओत बिकीनीमध्ये पाहिलं जाऊ शकतं. हे तर साफ आहे की, या तिघांनी एकमेकांसोबत एकत्र खूप चांगला वेळ घालवला. या तिघी देखील बिकीनीमध्ये एकत्र मस्ती करताना जलपरी दिसत होत्या.
अंडरवॉटर केली मस्ती
हा व्हिडिओ शेअर करत अनन्या पांडेने कॅप्शनमध्ये लिहिलंय की, 'जिथे महिला आहेत, तिथे जादू आहे. माझ्याभोवती ही जादू निर्माण केल्याबद्दल धन्यवाद. महिला दिनाच्या शुभेच्छा.' यासोबतच अनन्याने हार्ट इमोजीही शेअर केले आहेत. या पोस्टमध्ये एक व्हिडिओ आहे ज्यामध्ये तिन्ही स्टारकिड्स अंडरवॉटर मस्ती करताना दिसत आहेत.
सुहाना करणार डेब्यू?
दरम्यान, नुकतीच सुहाना झोया अख्तरच्या मुंबईतील ऑफिसबाहेर स्पॉट झाली होती. झोया अख्तरच्या आगामी 'द आर्चिज' या संगीतमय रोमँटिक चित्रपटातून ती बॉलिवूडमध्ये पदार्पण करणार असल्याची चर्चा आहे.