शाहरुख खानच्या लाडक्या सुहानाचा २२ वा वाढदिवस; आई गौरीने खास पद्धतीत केलं Wish
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही.
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरुख खान आणि गौरी खान यांची मुलगी सुहाना खानने अद्याप बॉलिवूडमध्ये पदार्पण केलेलं नाही. तरीही ती खूप लोकप्रिय आहे. आजचा दिवस तिच्यासाठी खूप खास आहे. कारण तिने 22 व्या वर्षात प्रवेश केला आहे. सुहानाचे मित्र आणि चाहते सोशल मीडियावर तिच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. गौरी खाननेही यावेळी आपल्या मुलीला खास फील केलं आहे.
गौरी खानने तिच्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर एका फोटोद्वारे तिला तिच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. तिने सुहाना खानचा एक ग्लॅमरस फोटो शेअर केला आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'बर्थडे गर्ल'. यासोबतच किसिंग इमोजीही तिने शेअर केले आहेत. सुहानाच्या या न पाहिलेल्या फोटोचं चाहते सोशल मीडियावर खूप कौतुक करत आहेत. या फोटोला असंख्य लोकांनी लाईक आणि शेअर केलं आहे. सुहानाचा हा न पाहिलेला फोटो पोस्ट झाल्यापासून मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
अशा स्थितीत या फोटोवर कमेंट्स आणि लाईक्सचाही वर्षाव होत आहेत. चाहत्यांसह अनेक सेलिब्रिटींनीही सुहानाला शुभेच्छा दिल्या आहेत. यामध्ये श्वेता बच्चन, फराह खान, मनीष मल्होत्रा ते करण जोहर आणि अभिनेत्री नेहा धुपिया यांच्या नावांचा समावेश आहे. बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवण्याआधीच सुहाना बड्या स्टार्समध्ये प्रसिद्ध झाली आहे. असे म्हटल्यास चुकीचं ठरणार नाही.