बॉलिवूडची `राजकन्या` सोशल मीडियावर ट्रोल
सुहाना नुकतीच ‘वोग इंडिया’च्या मुखपृष्ठावर झळकली
मुंबई : बॉलिवूडचा किंग शाहरुख खानची मुलगी सुहानानं 'वोग इंडिया'साठी केलेलं फोटोशूट चांगलचं चर्चेचा विषय ठरतंय. सुहाना तिच्या या फोटोशूटवरुन आता चांगलीच ट्रोल होतेय. बॉलीवुडच्या स्टारकन्येच्या यादीत आता एक नवे नाव समोर येतंय.... आणि हे नाव आहे खुद्द बॉलिवूडचा 'किंग' शाहरुखच्या राजकन्येचे... शाहरुखची मुलगी सुहाना खान ही सोशल मीडियावर प्रचंड फॉलोअर्स असलेली स्टारकन्या आहे. सुहाना आता ग्लॅमरच्या दुनियेत पदार्पण करतेय. वोग इंडियाच्या मुखपृष्ठावर सुहाना खान झळकली आहे. आपली पहिली व्यावसायिक असाईमेन्ट सुहानाने पार पाडलीय. पण सुहानाचं हे फोटो शूट वादात सापडलंय.
सुहाना खान हिलादेखील सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात लोकांच्या रोषाला सामोर जावं लागत आहे. सुहाना नुकतीच ‘वोग इंडिया’च्या मुखपृष्ठावर झळकली. शाहरुखनं स्वत: ‘वोग’च्या नवा अंकाचा फोटो शेअर केला. सुहाना वोगसारख्या प्रसिद्ध मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकली याचा आनंद शाहरुखला गगनात मावेनासा होता. मात्र सोशल मीडियावर यामुळे तीव्र संताप व्यक्त होताना दिसत आहे. सुहाना काही अभिनेत्री नाही किंवा तिनं अद्यापही बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं नाही, ती मॉडेलिंग क्षेत्रातही नाही मग ‘वोग’ मासिकात ती झळकण्यामागचं कारण काय? असा प्रश्न अनेक जण विचारत आहेत.
काही दिवसांपूर्वी जान्हवी ‘वोग’च्या मुखपृष्ठावर झळकली होती... पण किमान जान्हवीनं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. मात्र सुहानाला मुखपृष्ठावर का स्थान देण्यात आलं? असाही प्रश्न अनेक जण विचारत आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा ‘नेपोटिझम’चा वाद चर्चेत आलाय.