Suhana Khan dating Agastya Nanda : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचं 2023 हे वर्षे चांगलंच दमदार ठरलं. 2023 या वर्षातून शाहरुख खाननं पुन्हा कमबॅक केलं असं म्हणतात. कारण यावर्षी त्यानं बॅक टू बॅक तीन सुपरहिट चित्रपट दिले. याशिवाय हे वर्षे खान कुटुंबासाठी थोडक्यात चांगलं ठरलं आहे. त्याचं कारण म्हणजे यंदाच्याचवर्षी त्याची लेक सुहानानं देखील बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. सुहानानं 'द आर्चीज' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं असली तरी दुसरीकडे तिच्या अफेअरची चर्चा सुरु आहे. सुहानाचं नाव अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा यांच्यासोबत जोडण्यात येत आहे. दरम्यान, यावरून मिहिर आहुजानं रिअॅक्शन दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शाहरुख खानची लेक सुहाना खान आणि अमिताभ बच्चनचा नातू अगस्त्य नंदाच्या अफेयरविषयी गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. पण आता पर्यंत कोणी यावर वक्तव्य केलं नाही. यासगळ्यात सुहाना खान आणि अगस्त्य नंदाचा मित्र मिहिर आहूजानं या अफवांवर रिअॅक्शन दिली आहे. मिहिर आहूजानं झूमवर मुलाखत दिली असून त्यावर प्रतिक्रिया दिली आहे. मिहिर आहूजा म्हणाला की सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांच्या डेटिंग स्टेटसवर श्योर नाही आहे. मिहिर आहूजाच्या या वक्तव्यानंतर सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांच्या अफेअरच्या पुन्हा एकदा चर्चा सुरु झाल्या आहेत.


हेही वाचा : 'Animal चा शेवट पाहून डोळ्यात पाणी आलं, दोनदा चित्रपट पाहिला कारण...'; करण जोहर भावूक


दरम्यान, या आधी सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांचा 'द आर्चीज' या चित्रपटात फक्त रोमॅन्टिक सीन नाही तर किसिंग सीन देखील पाहायला मिळाला. त्यामुळे स्टार किड्सनं पहिल्याच चित्रपटात सगळ्या हद्द पार केल्या आहेत. तर सुहाना आणि अगस्त्य यांचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. त्यात त्यांचे न्यू इयर पार्टीत देखील ते एकत्र दिसले. त्या पार्टीत अगस्त्यसोबत त्याची बहीण नव्या नवेली नंदा देखील दिसली होती. हे पाहिल्यानंतर सोशल मीडियावर पुन्हा एकदा त्यांच्या रिलेशनशिपच्या चर्चा सुरु झाल्या होत्या. मात्र, त्या दोघांनी आजवर यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.