Suhana Khan Dance Trolled : सध्या सुहाना खानची बरीच चर्चा आहे. त्यातून सध्या तिचा पहिला वहिला चित्रपट 'द आर्चिज' हा रिलिज होण्याच्या मार्गावर आहे. शाहरूख खानचाही सिनेमा हा त्याचवर्षी प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे तिच्या या चित्रपटाची बरीच चर्चाही रंगलेली आहे. वर्षभराच्या प्रतीक्षेनंतर हा चित्रपट प्रदर्शित होतो आहे. 7 डिसेंबरला नेटफ्लिक्सवर तो प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाची बरीच चर्चाही रंगलेली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी चित्रपटाच्या प्रमोशनची सध्या बरीच चर्चा आहे. यावेळी सर्वच कलाकार या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहेत. अशाच एका प्रमोशन इव्हेंटमध्ये सुहाना खान आणि अगस्त्य नंदा यांनी एक रोमॅण्टिक डान्स केला आहे ज्याची जोरात चर्चा रंगलेली आहे. 


यावेळी त्यांच्या या डान्सवरून त्यांना ट्रोल करण्यात आलं आहे. त्यामुळे त्यांची जोरात चर्चा आहे. यावेळी ट्विटरवरून त्या दोघांना मोठ्या प्रमाणात ट्रोलही करण्यात आलं आहे. सोबतच यावेळी एका ट्रोलरनं तर चक्क शाहरूख खानवरच निशाणा साधला आहे. शाहरूख खान आणि त्यांच्या मुलांची अनेकदा चर्चा रंगलेली असते. त्यांना सोशल मीडियावर अनेकदा ट्रोल केले जाते. किंबहुना त्यांच्या प्रत्येक लेटेस्ट अपडेट्सची चर्चा असते. सुहानाचेही अनेकदा व्हिडीओज हे व्हायरल होताना दिसतात. अगस्त्य नंदा या चित्रपटातून प्रमुख भुमिका करणार आहे. तो आर्ची अॅड्रुज हे पात्र साकारणार असून सुहाना खान ही वेरोनिका हे पात्र साकारणार आहे. 


हेही वाचा : तनुजा यांनी धर्मेंद्र यांच्या लागवली होती कानशिलात, Flirt केल्यामुळे बांधली राखी अन्...


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


अभिनेत्री सुहाना खान हिची अनेकदा चर्चा ही रंगलेली असते. त्यातून तिचा व्हिडीओ सोशल मीडियावर तूफान व्हायरल होतो आहे. यावेळी या व्हिडीओत ती अगस्त्य नंदासोबत डान्स करताना दिसते आहे परंतु अनेक जणं तिला ट्रोल करत आहे. एकानं हा व्हिडीओ शेअर केला असून यात शाहरूख खानला टॅग करत ''हिला घरी घेऊन जा'' असं कॅप्शन दिलं आहे. तर एकानं म्हटलं की, ''सुहाना खान फोटोग्राफर्ससमोर किती नर्व्हेस होताना दिसते आहे.'' त्यामुळे तिला सर्वांनीच ट्रोल केलंय.