Sukesh Chandrashekhar Love Letter Jacqueline Fernandez : सुकेश चंद्रशेखर हा २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणी तुरुंगात आहे. गेल्या कित्येक महिन्यांपासून याप्रकरणी विविध खुलासे होताना दिसत आहे. दिल्लीच्या तुरुंगात बंद असलेल्या सुकेश चंद्रशेखर हा तुरुंगातून अनेकदा अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला पत्र पाठवत असतो. त्याने याआधी व्हॅलेंटाईन डे, बर्थडे यांसह अनेक खास प्रसंगी जॅकलिनला प्रेमपत्र पाठवले आहेत. आता त्याने पुन्हा एकदा तुरुंगातून जॅकलिन फर्नांडिसला प्रेमपत्र पाठवले आहे. यात त्याने वाढदिवसाचा उल्लेखही केला आहे.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुकेश चंद्रशेखरचा वाढदिवस 25 मार्चला आहे. त्यापूर्वी सुकेशने जॅकलिनसाठी एक खास प्रेमपत्र पाठवले आहे. यात त्याने जॅकलिन फर्नांडिसच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या इम्मी इम्मी (Yimmy Yimmy) गाण्याचाही उल्लेख केला आहे. सध्या तिचे हे गाणं चांगलेच चर्चेत आहे. या त्याने म्हटले की, "बेबी 25 मार्चला माझा वाढदिवस आहे. त्यापूर्वीच मला वाढदिवसाच्या दिलेल्या गिफ्टसाठी तुझे खूप खूप धन्यवाद. मी याला माझ्या वाढदिवसाचे प्री-गिफ्ट आहे असे समजेन. बेबी माझ्या आयुष्यात मला मिळालेली ही सर्वात गोड भेट आहे. मी यात ज्या गिफ्टबद्दल भाष्य करत आहे, ते म्हणजे तुझे नुकतेच प्रदर्शित झालेले इम्मी इम्मी (Yimmy Yimmy)गाणे." 


"या गाण्यामुळे सर्वांचीच तोंड बंद केलीस"


"बेबी, मी जेव्हा हे गाणे ऐकले, तेव्हा मला आश्चर्याचा धक्का बसला. या गाण्याचा प्रत्येक शब्द, प्रत्येक ओळ ही माझ्याबद्दल आहे. या गाण्यात आपली कथा आणि आपल्याबद्दलचे सर्व काही आहे. मला खात्री आहे की जो कोणी हे गाणं ऐकेल त्यालादेखील हेच वाटेल. आमच्या नात्याबद्दल अनेक प्रश्न, वाईट कमेंट सातत्याने येत होत्या. पण तू या गाण्यामुळे सर्वांचीच तोंड बंद केलीस. त्यामुळे मला खात्री आहे की प्रत्येकाला त्याच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल", असे सुकेशने यात म्हटले. 


"माझे हृदय धडधडते"


"हे गाणे फक्त ग्लॅमरस नाही, तर जॅकलिनने तिच्या प्रेमाची आठवण करुन देण्यासाठी केलेले आहे. हे गाणे यावर्षीचे लव एंथम आहे. बेबी तू त्या गाण्यात फारच सुंदर दिसत आहेस. मी जेव्हा जेव्हा हे गाणे पाहतो, तेव्हा माझे हृदय धडधडते. बेबी माय बोम्मा, तुझ्याशिवाय वाढदिवसाचे सेलिब्रेशन करण्याला काहीही अर्थ नाही. पण यंदाचे हे वर्ष तुझ्या गाण्यामुळे खूपच खास झाले आहे." असेही सुकेशने यात म्हटले आहे. 


दरम्यान सुकेशने जॅकलिनला 52 लाखांचा घोडा भेट म्हणून दिला होता. तर 9 लाखांची पर्शियन मांजरही त्याने तिला गिफ्ट म्हणून दिली होती. सध्या तो तिहार तुरुंगात आहे. त्याच्यावर 200 कोटी रुपयांच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे.