Sulochana Didi Best Films Till Date: ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दीदी यांचे नुकतेच वयाच्या 94 व्या वर्षी निधन झाले आहे. त्यांच्या निधनानं मराठी चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीत गेली साठहून अधिक वर्षे सुलोचना दीदी यांनी आपल्या दर्जेदार अभिनयानं प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली होती. कृष्णधवल रूपेरी पडदा, नवे दिग्दर्शक, बहारदार कथा, संगीत आणि अभिनयातील सहजता यामुळे त्या काळातील चित्रपट हे मराठी मनाच्या हृदयावर राज्य करणारे होते.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशा काळात रूपेरी पड्यावर एका अभिनेत्रीचे आगमन झाले, ज्यांचे नाव होते सुलोचना लाटकर. रेखीव चेहरा, गोरापान रंग आणि कोमल आवाज यामुळे या अभिनेत्रीकडं सगळ्याच्या नजरा वळल्या होत्या. त्यांची कारकीर्द ही फार मोठी आहे. त्यांच्या या कारकीर्दीतले त्यांचे अनेक सिनेमे प्रचंड गाजले तेव्हा या लेखातून जाणून घेऊया त्यांच्या आजवरच्या उत्कृष्ट अभिनयानं गाजलेल्या भुमिका. त्यांच्या अभिनयानं त्यावेळी प्रेक्षकांना अक्षरक्ष: वेड लावले होते. आजही त्यांचे चित्रपट आवडीनं पाहिले जातात. 


1. मराठा तितुका मेळवावा 


'मराठी तितुका मेळवावा' या 1964 साली आलेल्या चित्रपटानं छत्रपती शिवाजी महाराज आणि जिजाऊ यांच्या नात्यातील ओलावा प्रेक्षकांसमोर मांडला होता. या चित्रपटात सुलोचना दीदींनी जिजाऊ यांची भुमिका साकारली होती. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे भालजी पेंढारकर यांनी केले होते. या चित्रपटातील गाणीही प्रचंड गाजली होती. ''रेशमाच्या रेघांनी...'' हे या चित्रपटातील गाणं हे विशेष गाजलं. 


2. सांगते ऐका 


'सांगते ऐका' या चित्रपटातूनही सुलोचना दीदी यांची भुमिका गाजली होती. हा चित्रपट अनंत माने यांनी दिग्दर्शित केला होता. त्या काळी हा चित्रपट आणि या चित्रपटातील गाणी ही विशेष गाजली होती. या चित्रपटातून त्यांनी सखाराम म्हणजेच चंद्रकांत मांडरे यांच्या पत्नीची भुमिका केली होती. 


3. साधी माणसं 


'साधी माणसं' या चित्रपटातूनही त्यांनी भुमिका केली होती. हा चित्रपटही फार गाजला होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन हे भालजी पेंढारकर यांनी केले होते. 


4. देवर 


'देवर' या चित्रपटाचे दिग्दर्शक मोहन सेहेगल यांनी केले होते. या चित्रपटात धर्मेंद्र यांची प्रमुख भुमिका होती. या चित्रपटात शकुतंला सिंग यांची भुमिका केली होती. 


5. बंदिनी 


सुप्रसिद्ध दिग्दर्शक बिमल रॉय यांच्या गाजलेल्या 'बंदिनी' या चित्रपटातूनही त्यांनी महत्त्वाची भुमिका केली होती.