भारतातील सर्वात महागड्या बाईक्स; एवढ्या किंमतीत खरेदी कराल 1BHK फ्लॅट

भारतातील सर्वात महागड्या बाईक्स कोणत्या आणि याची किंमत तसेच फिचर्स जाणून घेऊया. 

| May 19, 2024, 21:48 PM IST

Expensive Bikes: अनेकांना सुपर कार प्रमाणे सुपर बाईकचे वेड असते. भारततही महागड्या बाईक विकल्या जातात. या बाईकच्या किंमतीत 1BHK फ्लॅट आणि Audi-BMW सारख्या महागड्या कार खरेदी करता येतील. 

 

1/7

सुपरबाईक्सचं वेड कुणाला नसत? भारतातही सुपरबाईकचे चाहते. जाणून घेऊया भारतात विकल्या जाणाऱ्या महागड्या सुप बाईक. 

2/7

Kawasaki Ninja H2R  या बाईकची स्टार्टिंग प्राईज 79 लाख 90 इतकी आहे. 

3/7

Kawasaki Ninja H2R ही भारतातील सर्वात महागडी बाईक आहे.  या बाईकमध्ये  मोबाइल ॲप कनेक्टिव्हिटी, GPS, दोन डिजिटल ट्रिप मीटर, स्टँड अलार्म या सारखे फिचर्स मिळतात. या बाईकचा टॉप स्पीड 320 kmph आहे.  

4/7

Honda Gold Wing या बाईकमध्ये जबरदस्त फिचर्स मिळतात. एअरबॅग, क्रूझ कंट्रोल, अँड्रॉइड ऑटो-ॲपल कारप्ले, टायर प्रेशर मॉनिटरिंग सिस्टम यासारखे फिचर्स मिळतात.  या बाईकचा टॉप स्पीड 230 kmph आहे. 

5/7

Honda Gold Wing  या लक्झरी बाईकची भारतीय बाजारात किंमत 43 लाख 41 हजार 42 रुपये इतकी आहे. 

6/7

 डुकाटीच्या Ducati Panigale V4 R या लक्झरी बाईकची किंमत 69 लाख 99 हजार रुपये इतकी आहे. 

7/7

 Ducati Panigale V4 R Features ही भारतातील महागडी बाईक आहे.  या बाईकमध्ये 998 cc चे अत्यंत पावरफुल इंजिन आहे. या बाईकमध्ये ABS EVO, ट्रॅक्शन कंट्रोल EVO, इंजिन ब्रेक कंट्रोल, डुकाटी स्लाइड कंट्रोल सारखे सेफ्टी फिचर्स मिळतात.