नवी दिल्ली : इंटरनेटच्या दुनियेची जादू इतकी जबरदस्त आहे की काही वेळात तुम्ही प्रसिद्ध होऊ शकता किंवा लोकांच्या चर्चेचा विषय ठरु शकता. अलीकडेच युट्यूबवर 'मेक जोक ऑफ' अत्यंत लोकप्रिय ठरले. त्याचे सर्व व्हिडिओज लाखो लोकांनी पाहिले आहेत. तसंच आता सोशल मीडियावर सध्या सुमन आंटीचे वारे वाहू लागले आहेत. 


काय करते ही सुमन आंटी?


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुमन आंटीचे व्हिडिओज सोशल मीडियावर लोकांच्या चांगलेच पसंतीस पडत आहेत. व्हिडिओत सुमन आंटी गृहिणींच्या कथा सांगते. या सर्व कथा अत्यंत इंटरेस्टिंग आहेत. ती भारतीय कुटुंबातील प्रत्येक प्रकारच्या पत्नीची व्यक्तिरेखा सादर करते. म्हणजे ज्यांच्या लग्नाला १० वर्ष झाली आहेत अशी गृहिणी, विभक्त कुटुंबात राहणारी गृहिणी. अत्यंत मजेदार पद्धतीने गृहिणींच्या भावना मांडल्या आहेत.



कोण आहे ही?


युट्यूबवर मिर्ची पूजा नावाच्या चॅनलवर हे व्हिडिओज अपलोड करण्यात आले आहेत. राजस्थानातील एका खाजगी एफएम आरजे म्हणून कार्यरत असलेल्या पूजाचे हे चॅनल आहे. संपूर्ण जगातील लोकांना जोडणारे सोशल मीडिया हे माध्यम आहे. तसंच आपली कला सादर करण्याचे जबरदस्त व्यासपीठ आहे, असे म्हणायला काहीच हरकत नाही.