`बदकासारखे ओठ`, कपिल शर्मानं खिल्ली उडवण्यावर Sumona Chakravarti म्हणाली...
Sumona Chakravarti : कपिल शर्मा हा नेहमीच त्याच्या कार्यक्रमात सुमोनाच्या चेहऱ्यावर आणि ओठांवर विनोद करताना दिसतो. त्यावर आपण सगळे हसत असलो तरी तिच्यावर त्याचा काय परिणाम होतो याविषयी तिनं सांगितलं आहे.
Sumona Chakravarti : 'द कपिल शर्मा शो' हा छोट्या पडद्यावरील लोकप्रिय कॉमेडी कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे लाखो चाहते आहेत. या कार्यक्रमानं सुरुवातीपासून प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. कॉमेडीचा एक वेगळाच तडका आपल्याला या कार्यक्रमात पाहता येतोय. या आधी हा कार्यक्रम 'कॉमेडी नाइट्स विथ कपिल' या नावानं ओळखला जात होतो. या कार्यक्रमातील कास्ट ही तिच आहे. या कार्यक्रमातील अनेक कॉमेडी डायलॉग्स प्रेक्षक त्यांच्या खऱ्या आयुष्यात वापरू लागले होते. कपिलच्या कॉमेडी डायलॉग्सची क्रेझ आजही प्रेक्षकांना आहे. दरम्यान, कपिल हा नेहमीच त्याची ऑनस्क्रिन पत्नी सुमोना चक्रवर्तीच्या चेहऱ्याची तिच्या ओठांची खिल्ली उडवताना दिसतो. त्यावर आपण सगळेच हसतो, पण जेव्हा हे विनोद आपल्यावर होतात तेव्हा आपल्याला कसं वाटू हे अनेकांना कळत नाही. दरम्यान, सुमोनाला कसं वाटलं याविषयी तिनं सांगितलं आहे.
कपिल सुमोनाच्या ओठांवर कमेंट करत 'बत्तख के जैसे होंठ हैं इसके' असं बोलायचा. सुमोना चक्रवर्ती याविषयी बोलताना म्हणाली जेव्हा कपिल शर्मा तिच्या ओठांवर विनोद करायचा. तेव्हा तिला खूप वाईट वाटायचं. इतकंच नाही तर तिला इनसिक्योर वाटू लागलं होतं. पण आता अर्चना पूरन सिंगनं तिला समजवलं. तर अर्चना शोमध्ये कायमसाठी आता राहिल्या आहेत.
हेही वाचा : "तो हिरो आणि मी साईडला असे...", Ravindra Mahajani यांच्या निधनावर बोलताना अशोक सराफ भावूक
याशिवाय सुमोना मुलाखतीत म्हणाली की ती आधी पासून कमी बोलणारी आणि लाजाळू आहे. तिला तिचं आयुष्य खासगी ठेवायला आवडतं. इतकंच नाही तर जसं जसं तिला यश मिळत आहे तशी तशी ती अजून रिझर्व होते. दरम्यान, कपिल सध्या भारतात नाही. तो सध्या त्याच्या संपूर्ण टीमसोबत यूएस टूर करत आहे. तर अशा चर्चा आहेत की तो भारतात परतल्यानंतर तो त्याच्या या कार्यक्रमाचा एक नवा सीझन घेऊन येणार आहे.