Vijay Varma : बॉलिवूड अभिनेता विजय वर्माचा गेल्या काही दिवसांपासून त्याच्या IC 814: The Kandahar Hijack या सीरिजमुळे चर्चेत आहे. या सीरिजमधील त्याच्या भूमिकेनं सगळ्यांची मने जिंकली. पण विजय वर्मानं आजवर फक्त हीरोच्या नाही तर खलनायकाच्या देखील भूमिका साकारल्या आहेत. खरंतर या आधी विजयनं खलनायकाच्या अशा भूमिका साकारल्या आहेत की त्यामुळे त्याची प्रतीमा ही ते कॅरेक्टर झालं होतं. खऱ्या आयुष्यात महिला आणि मुली त्याच्या जवळ जायला देखील घाबरायच्या. याचा खुलासा स्वत: विजय वर्मानं एका मुलाखतीत केला आहे. विजय वर्मानं सांगितलं की एकदा गायिका सुनिधी चौहाननं त्याला जवळ येऊ नकोस अशी चेतावनी दिली होती. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

विजय वर्मानं 'इंडियन एक्सप्रेस'ला ही मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यानं सांगितलं की अनेक सुंदर मुली आणि आईंनी त्याला सांगितलं होतं की त्यांना त्याची भीती वाटते. त्यामुळे विजय वर्माला खूप चिंता वाटू लागली होती. त्याचं कारण विजय वर्मानं 'डार्लिंग्स' आणि 'दहाड' सारख्या चित्रपटांमध्ये आणि She सारख्या वेब सीरिजमधील त्याची भूमिका आहे. 


याविषयी सांगत विजय वर्मा म्हणाला 'अनेक सुंदर मुली आणि त्यांच्या आईनं त्याला सांगितलं होतं की त्यांना माझी भीती वाटते. यामुळे मला खूप चिंता वाटू लागली होती. मी 'पिंक' मध्ये सगळ्यात पहिली खलनायकाची भूमिका साकारली होती. ती भूमिका छोटी होती, पण मला आजही आठवण आहे की त्या चित्रपटाच्या स्क्रीनिंगला सगळ्या महिला होत्या. त्याशिवाय त्या अभिनेत्री देखील होत्या ज्यांना मी कधी मोठ्या पडद्यावर पाहायचो. स्क्रीनिंगपर्यंत तर सगळं ठीक होतं, पण त्यानंतर सगळ्या रडू लागल्या. काही महिला तर बाहेर जायला देखील तयार नव्हत्या. तिथे सुनिधी चौहान देखील बसली होती. मी तिची सांत्वन करण्यासाठी तिच्या जवळ गेलो तर ती मला म्हणाली माझ्या जवळ येऊ नको. मला तुझी भिती वाटते. मी विचार करु लागलो की मी काय केलं? मग माझ्या दिग्दर्शकानं मला बाजूला घेऊन समजावलं की तू चित्रपटात खूप चांगलं काम केलं आहे.'


हेही वाचा '20 वर्षात असा कोणताच स्पर्धक पाहिला नाही जो...'; म्हणत अमिताभही थक्क! स्पर्धकाने 'या' कारणासाठी अर्ध्यात सोडला KBC चा शो


दरम्यान, 'पिंक' या चित्रपटाविषयी बोलायचं झालं तर 2016 मध्ये हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. तापसी पन्नू आणि अमिताभ बच्चन देखील इथे उपस्थित होते. त्यानंतर विजय वर्मानं निर्णय घेतला की आगामी प्रोजेक्टमध्ये तो त्याची ही निगेटिव्ह छाप खोडून काढण्याचा प्रयत्न करेल.