KBC 16 : 'कौन बनेगा करोडपति' हा शो सुरु झाल्यापासून प्रेक्षकांच्या आवडीचा ठरत आहे. या शोमध्ये येणारी अनेक लोक हे लाखो रुपये घरी घेऊन जातात. तर कोणी कोट्यावधी देखील होतं. दरम्यान, या सीझनमध्ये असं काही झालं जे याआधी 24 वर्षांमध्ये कधी झालं नव्हतं. शोचा प्रोमो समोर आला असून त्यात घडलेल्या गोष्टीनं सगळ्यांना आश्चर्य झालं आहे. नेमकं काय झालं असा तुम्हाला प्रश्न पडला असेल तर त्यांचं आहे असं की एका स्पर्धकानं अमिताभ बच्चन यांच्याकडे थेट गेम मध्येच सोडण्याची विनंती केली. जे ऐकून अमिताभ यांना देखील मोठा धक्का बसला आहे.
यावेळी हॉटसीटवर बसलेले स्पर्धक नीरज सक्सेना JSI यूनिवर्सिटीच्या PRO चाउंसलर आहेत. त्यांना येत असलेल्या सगळ्या गोष्टी ऐकून अमिताभ बच्चन यांना देखीस त्यांचे कौतूक वाटू लागले. त्यांनी सांगितलं की ते भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती डॉ. ए.पी. जे. अब्दुल कलाम यांच्यासोबत काम केलं आहे. अब्दुल कलाम हे त्याचे बॉस होते ज्यांच्यासोबत त्यांनी अनेक प्रोजेक्ट्सवर काम केलं आहे.
नीरज सक्सेसा हे शोमध्ये खूप चांगलं काम करत होते. ते यावेळी शोमध्ये 6, 40, 000 ही रक्कम जिंकली पण त्याचवेळी त्यांनी एक असा निर्णय घेतला ज्यानं सगळ्यांना आश्चर्य झालं. नीरज हा शो मध्येच सोडण्याचा त्यांचा निर्णय सांगतात. ते हे यामुळे सांगतात की गेम शोमध्ये आलेल्या दुसऱ्या स्पर्धकांना एकदा खेळण्याची संधी मिळू शकेल. नीरज सक्सेना यांनी सांगितलं की सर, एक विनंती आहे. मला आता शो क्विट करायचा आहे. माझी इच्छा आहे की बाकी स्पर्धकांना देखील खेळण्याची संधी मिळायला हवी. इथे सगळे माझ्याहून लहान आहेत, जे मिळालं ते खूप झालं.
हेही वाचा : 'मुन्नाभाई 3' का येत नाहीये? दिग्दर्शक राजकुमार हिरानींनी सांगितली सगळ्यात मोठी अडचण
स्पर्धकानं केलेलं हे वक्तव्य ऐकल्यानंतर अमिताभ यांना आश्चर्य झालं आणि ते पुढे म्हणाले, 'सर, मी आधी कधी हे उदाहरण पाहिलं नाही. हा तुमचा मोठेपणा आहे आणि मोठं मनं आहे आणि आज मी तुमच्याकडून खूप काही शिकले. मला सगळ्या जनतेला एकच सांगायचं आहे की ही पहिली वेळ आहे, कारण गेल्या 20 वर्षांपासून सुरु असलेल्या या कार्यक्रमात कोणत्याच स्पर्धकानं त्यांच्यासोबतच्या लोकांसाठी गेम क्विट केलेला नाही.'