मुंबई : गायिका सुनिधी चौहान हिने 1 जानेवारीला मुलाला जन्म दिला आहे. सुनिधीचं हे पहिलं बाळ आहे. संध्याकाळी 5:20 वाजता तिने मुंबईतील एका  रुग्णालयात मुलाला जन्म दिला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनिधी आणि तिचा पती हितेश सोनिक नव्या पाहुण्याच्या येण्याने आनंदात आहेत. डॉक्टरांनी म्हटलं की, "आई आणि बाळ दोघेही सुरक्षित आहेत. सुनिधी आणि तिचे पती हितेश दोन्ही अतिशय आनंदी आहेत. नवीन वर्षाच्या पहिल्याच दिवशी त्यांच्यासाठी ही आनंदाची बातमी आली. ४ महिन्यांपूर्वी सुनिधीही प्रेग्नेट असल्याचं समोर आलं होतं. सुनिधीने आपल्या करिअरची सुरुवात ४ वर्षाची असतांना केली होती.


अनेक सिंगिंग रिअॅलिटी शोमध्ये तिने भाग घेतला आहे. तिच्यामधील टॅलेन्टला टीव्ही अँकर तबसुमने ओळखलं. तिने सुनिधीच्या पालकांना मुंबईला येण्यास सांगितले. त्यानंतर सुनिधीला दूरदर्शनच्या रिअॅलिटी शो मेरी आवाज सुनो शोमध्ये सहभागी होण्याची संधी मिळाली होती. या शोमध्ये सुनिधीने विजय मिळवला होता. सुनिधीने 'शीला की जवानी, इश्क सुफियाना, विडी जलईले, देसी गर्ल, कमली, भागे रे मन असे हिट गाणे गायले आहेत.