टोमॅटोचे दर वाढल्याने सुनील शेट्टीही चिंतेत! म्हणाला, `लोकांना वाटतं की सेलिब्रिटींना...`
Suniel Shetty On Tomato Price Hike: सर्वसमान्यांना सेलिब्रिटींना महागाईचा, टोमॅटोंचा दर वाढल्याचा परिणाम होत नाही असं वाटत असतं असा उल्लेख करत सुनील शेट्टीने असं नसल्याचं सांगितलं आहे. या सर्व गोष्टींचा कलाकारांवरही परिणाम होतो असं तो म्हणाला.
Suniel Shetty On Tomato Price Hike: देशातील टोमॅटोच्या दरांनी आधीचे सर्वच विक्रम मोडीत काढले आहेत. टोमॅटोच्या वाढलेल्या दरांमुळे रोजच्या वापरातील या फळभाजीला किचनमधून बाहेरचा रस्ता दाखवून आठवड्याभराहून अधिक काळ उटलला आहे. सर्वासामान्यांनी महिन्याचं आर्थिक बजेट कोलमडू देण्यापेक्षा टोमॅटोकडेच दुर्लक्ष करण्यास सुरुवात केली आहे. मात्र टोमॅटोच्या दरवाढीचा फटका अभिनेता सुनील शेट्टीलाही बसल्याचं तुम्हाला सांगितलं तर नक्कीच आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे आणि याबद्दल सुनील शेट्टीनेच माहिती दिली आहे.
आम्हालाही बसतो फटका
सुनील शेट्टीने सेलिब्रिटींनाही महागाईचा फटका बसतो असं म्हटलं आहे. "माझी पत्नी माना केवळ 2 ते 3 दिवसांच्या भाज्या एकावेळेस घरी आणते. आम्ही ताज्या भाज्या खाण्यास अधिक प्राधान्य देतो. मात्र सध्या टोमॅमटोचे दर वाढले आहेत. त्याचा परिणाम आमच्या घरातील किचनवरही झाला आहे. मी हल्ली कमी टोमॅटो खातो. लोकांना वाटू शकतं की सुपरस्टार असल्याने याला महागाईचा काय फरक पडतो. मात्र असं काहीही नाही. आम्हालाही या सर्व गोष्टींचा फटका बसतो," असं सुनील शेट्टीने आजतकला दिलेल्या मुलाखतीमध्ये म्हटलं आहे.
मी अॅपवरुन मागवतो भाज्या कारण
"तुमचा विश्वास बसणार नाही मी अॅपवरुन भाज्या मागवतो. तिथे भाज्यांचे दर पाहून तुम्ही नक्कीच थक्क व्हाल. खरं तर या अॅपवर बाजारपेठेपेक्षा स्वस्त भाज्या मिळतात. मात्र केवळ स्वस्त भाज्या मिळतात म्हणून मी यावरुन भाज्या मागवत नाही तर या भाज्या ताज्या असतात. भाज्या कुठे पिकवण्यात आल्यात? कोणत्या मातीत त्यांचं उत्पादन घेतलं आहे याची माहिती इथे दिली जाते. हे सर्व पाहूनच मी इथून भाज्या घेतो. याचा संपूर्ण फायदा शेतकऱ्यांना होतो. त्यांचा माल थेट ग्राहकांपर्यंत पोहोचतो," असं सुनील शेट्टीने सांगितलं.
मी भाव करुनच खरेदी करतो
सुनील शेट्टी हा स्वत: हॉटेल व्यवसायिक आहे. याचा संदर्भही त्याने दिला. "सेलिब्रिटी सर्वसामान्यांशी संबंधित भाज्या वगैरेसारख्या गोष्टींबद्दल फार जागृक नसतात असं म्हटलं जातं. मात्र याउलट आम्ही जास्त सजग असतो याबद्दल खास करुन मी एक हॉटेल व्यवसायिकही आहे. मी प्रत्येक गोष्ट भाव करुनच घेतो. जर महागाई वाढत आहे आणि टोमॅटोचे दर एवढे वाढलेत तर मला कुठे ना कुठे चवीबद्दल तडजोड करावी लागते. मी ती करतोही," असंही सुनील शेट्टीने सांगितलं.
अनेक भाज्या मी फार्म हाऊसमध्ये लावल्या आहेत
भाज्यांच्या वाढत्या दरांवरील एका उपायाबद्दलही सुनील शेट्टीने भाष्य केलं. "मी माझ्या खंडाळ्यातील फार्म हाऊसमध्ये अनेक भाज्या लावल्या आहेत. मी अनेक भाज्या नैसर्गिकरित्या पिकवतो. माझा संपूर्ण रविवार या भाज्यांची काळजी घेण्यात, त्यांची मशागत करण्यात जातो. मी तिथे लीटी, एव्हाकाडो, टोमॅटोबरोबरच अनेक गोष्टींचं उत्पादन घेतलं आहे. मी पावसाचं पाणीही साठवतो. मी असा अभिनेता नाही तो केवळ चित्रपटाच्या प्रमोशनच्या वेळी पर्यावरणाबद्दल जागृकतेचे धडे दोते. मी फार साधं आयुष्य जगण्यास प्राधान्य देतो," असं सुनील शेट्टी म्हणाला.