Sunil Grover Sri Sri Ravi Shankar : लोकप्रिय कॉमेडियन कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर हे त्यांच्या शोमुळे सतत चर्चेत असतात. यावेळी त्यांचं चर्चेत येण्याचं कारण हे बंगळुरुमध्ये आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्यासोबतचा एक व्हिडीओ आहे. त्या तिघांचा चर्चा करतानाचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. जेव्हा कपिलनं मस्करी करत म्हटलं की ही जी चर्चा आहे ती सुनीलवर आधारीत आहे. गुरुदेव ते सुनीलच्या प्रश्नावर खूप हसले.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

कपिल शर्मा आणि सुनील यांनी शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सुनीलनं आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांना त्यांच्या संघर्षाविषयी प्रश्न विचारला. तो म्हणाला, गुरुदेव, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. जेव्हा दोन मित्र, जे एकमेकांवर खूप प्रेम करतात. त्यांच्यात भांडण होतं, तर त्यांच्यात 6 वर्षांसाठी दुरावा येऊ नये यासाठी काय करायला हवं?


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

सुनील ग्रोव्हरच्या प्रश्नांनी सगळ्या प्रेक्षकांना हसू अनावर झालं. त्याचं कारण म्हणजे सगळ्यांना ही गोष्ट सुनील ग्रोव्हर आणि कपिल शर्मा संबंधीत असल्याचं माहित आहे. कारण त्यांच्यात झालेल्या एका वादानंतर ते दोघं जवळपास 6 वर्ष एकमेकांशी बोलले नव्हते. इतकंच नाही तर ते एकत्र काम देखील करत नव्हते. आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर हे या प्रश्नावर आधी हसतात आणि उत्तर देत बोलतात की 'संघर्ष प्रेमाचा भाग आहे. प्रेम कोणावर करणार आणि भांडण दुसऱ्याशी असं शक्य नाही आणि असं कधी होतही नाही. तुमच्यासाठी प्रेम आणि भांडण या दोन्ही गोष्टींसाठी एकत्र राहणं गरजेचं असतं.' 


दरम्यान, या व्हिडीओवर नेटकरी विविध कमेंट करताना दिसत आहेत. एक नेटकरी कमेंट करत म्हणाला, 'इगो आणि अॅटिट्यूड बाजूला ठेवा.' दुसरा नेटकरी म्हणाला, 'भांडा पण एकमेकांची साथ सोडू नका.'


हेही वाचा : वरुण धवनला खरंच मुली आवडत नाहीत? श्रद्धा कपूरने सांगितला जुना किस्सा


काही वर्षांपूर्वी अशी बातमी आली होती की ऑक्टोबर 2017 मध्ये ऑस्ट्रेलियावरून फ्लाइटमध्ये जाताना कपिल शर्मा आणि सुनील ग्रोव्हर यांच्यात वाद झाला होता. कपिलनं मद्यधुंद अवस्थेत मारहाणीचा आरोप केला. घटनेनंतर सुनीलं त्याला लोकप्रियता मिळालेला 'द कपिल शर्मा शो' सोडला. त्या शोमध्ये सुनील ग्रोव्हरनं गुत्थी आणि डॉ. गुलाटी ही भूमिका साकारली होती.