मुंबई : अभिनेता सुनील ग्रोव्हरवर जानेवारी महिन्यात हार्ट सर्जरी झाली होती. जेव्हा सुनीलने त्याच्या चाहत्यांना हार्ट सर्जरीची माहिती दिली. तेव्हा सर्वांनाच धक्का बसला. सुनीलवर चाहते नाराज झाले. सुनील त्याच्या फिटनेसबद्दल खूप डेडिकेटिड आहे.  ज्यामुळे तो लवकर बरा झाला. सर्जरीनंतर केवळ 25 दिवसांनी तो कामावर परतला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुनील कामावर परतल्यानंतर चाहत्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला. सुनीलने नुकतंच त्याच्या आगामी चित्रपट ब्लॅकआउटचं शूटिंग पूर्ण केलं आहे. कामावर परत आल्याने सुनील खूप खूश आहे. काम सुरू झालं असून परत आल्याने खूप आनंद होत असल्याचं त्याने सांगितलं. शस्त्रक्रियेनंतर सुनीलचं आयुष्य आता सामान्य झालं आहे.  


दिलेल्या एका मुलाखतीत सुनीलने त्याच्या तब्येतीबद्दल सांगितलं. सुनील म्हणाला, मी कोरोना पॉझिटिव्ह झालो होतो आणि मला सौम्य लक्षणे होती. नंतर मला अस्वस्थ वाटू लागलं, म्हणून मी डॉक्टरांचा सल्ला घेतला. जेव्हा मी तपासणी केली तेव्हा माझ्या हृदयात काही समस्या आली आणि त्यानंतर माझ्यावर शस्त्रक्रिया झाली.


माझं हृदय धडधडत आहे
सुनील ग्रोव्हर पुढे म्हणाला, माझं हृदय एकदम मस्त धडधडत आहे आणि मला श्वास घेण्याचा आनंद मिळत आहे. मला अधिक निरोगी आणि उत्साही वाटतं. मी माझ्या कामावर अधिक लक्ष केंद्रित करू शकतो.