मुंबई : कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्या वादामुळे या दोघांनी पुन्हा कधीच एकत्र काम केलं नाही.  मधल्या काळात अशी माहिती मिळाली होती की, कपिल शर्मा शोमध्ये हे दोघं एकत्र येणार . पुन्हा एकदा प्रेक्षकांना कपिल आणि सुनीलची जादू अनुभवायला मिळणार असं प्रेक्षकांना वाटत असताना त्यांची नाराजी झाली आहे. सुनीलने आपला दुसरा शो सुरू केला. एका वाहिनीवर सुनीलने 'कानपुरवाले खुरानाज' हा शो सुरू केला. पण आता हा शोपण प्रेक्षकांचा निरोप घेत आहे. असं सगळं असताना अशी माहिती मिळत आहे की, सुनील ग्रोवर आणि कपिल पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर एकत्र वापसी करत आहेत. सध्या भारत सिनेमाच्या शुटिंगमध्ये व्यस्त आहे. पण जसं हे शुटिंग संपेल या नव्या शोच्या तयारीला ही मंडळी लागणार आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दोघांना एकत्र आणण्यात अभिनेता सलमान खानची खूप मोठी आणि महत्वाची भूमिका असल्याचं समोर आलं आहे. कारण सलमान खानचं या कपिल शर्मा शोचं प्रोडक्शन करणार आहे. तसेच सलमानची इच्छा आहे की, सुनील या शोचा भाग असावा. तसेच सुनीलने याबाबत कबुल देखील केलं आहे की, सलमान खानकडून याबाबत त्याला विचारणा देखील झाली होती. तसेच सुनीलने 'कानपुर' या त्याच्या शोनंतर कुणालाही आपल्या तारखा दिलेल्या नाहीत. त्यामुळे या गोष्टीवर शिक्कामोर्तब झाला आहे की, लवकरच कपिल-सुनील एकत्र येणार आहेत. 


तसेच काही दिवसांपूर्वी सुनीलने देखील असे संकेत दिले होते की, लवकरच पुन्हा भेटीचे दिवस येऊ शकतात. आम्ही पुन्हा एकत्र काम करू शकतो? फक्त सलमानच नाही तर कपिल आणि सुनीलचे चाहते देखील त्यांना एकत्र काम करताना बघण्यात उत्सुक आहेत. पुन्हा एकदा ती धम्माल चाहत्यांना अनुभवता येणार आहे.