मुंबई : सध्या सोशल मीडियावर एका कॉमेडियनची प्रचंड चर्चा आहे. सध्या कॉमेडीयन त्याच्या चाहत्यांसोबत  सतत मजेदार व्हिडिओ शेअर करत आहेत. कधी हा अभिनेता भाजी मार्केटमध्ये भाजी विकताना दिसला होता तर कधी हा अभिनेता रस्त्याच्या कडेला बसून कपडे धुताना दिसला होता. आता अलीकडेच त्याने त्याच्या सोशल मीडिया अकाउंटवर आणखी एक व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामध्ये तो दुकानात केस कापताना दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

सुरु केलाय का नवा व्यवसाय?
व्हिडिओमध्ये सुनील केस कापताना दिसत होता. यावेळी एक माणूस खुर्चीवर बसला असून सुनील त्याचे केस कापत आहे. यावेळी सुनीलने पांढरा टी-शर्ट आणि प्रिंटेड शॉर्ट्स घातल्या आहेत. व्हिडिओ शेअर करत सुनीलने कॅप्शनमध्ये लिहिलं आहे की,  'संडे बेस्ट है'. सुनीलची ही स्टाईल पाहून त्याचा चाहत्यांना त्याची ही स्टाईल खूप आवडली आहे.


चाहत्यांनी दिल्या अशा प्रतिक्रिया 
सुनीलच्या या व्हिडीओवर कमेंट करत एका यूजरने लिहिलं की,  नॅचरल एक्टर सुनिल साहेब प्रत्येक ठिकाणी फिट होवून जातो.  तर अजून एकाने लिहीलंय, पाज्जी मला कटोरा कट हेअर स्टाईल हवी आहे. कधी येवू?   तर अजून एकाने लिहीलंय, पाज्जी तुस्सी कमाल हो. तर अजून एकाने म्हटलंय, भैय्यी जी तुम्ही या कोणत्या लाईनमध्ये आलात. तर अजून एकाने म्हटलंय, किती कमतोय तू केस कापून. अशा प्रकारच्या अनेक मजेशीर कमेंट युजर्स अभिनेत्याच्या पोस्टवर करत आहेत.


याआधी रस्त्यावर कपडे धुताना दिसला होता.
याआधी, अभिनेत्याने एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो रस्त्याच्या कडेला बसून कपडे धुताना दिसला होता. हा व्हिडिओ शेअर करत सुनीलने कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की,  'मी माझे आवडते काम करत आहे.' सुनीलच्या व्हिडिओच्या पार्श्वभूमीवर पंजाबी गायक एपी धिल्लॉनचे ट्रेंडिंग गाणं "विथ यू" वाजत होतं. सोशल मीडियावर चाहत्यांनी सुनीलच्या या व्हिडिओचं खूप कौतुक केले होते.


 याचबरोबर सुनीलने काही दिवसांपूर्वी त्याच्या सोशल मीडियावर आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता, ज्यामध्ये तो भाजी मंडईत बसून लसूण विकतानाही दिसला होता. याशिवाय कॉमेडियनने आणखी एक व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओमध्ये तो पाणी काढताना दिसला होता. तर एकदा अभिनेता  छत्र्या विकताना दिसला होता.