मुंबई : बॉलिवूडची अभिनेत्री श्रेया धन्वंतरी (shreya dhanwanthary) सध्या तिच्या 'चूप' चित्रपटाच्या यशाचा आनंद घेत आहे. या चित्रपटात श्रेयाने एंटरटेन्मेंट रिपोर्टरची भूमिका साकारली आहे. 'चूप'ला समीक्षक आणि प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. या चित्रपटात सनी देओल आणि सलमान दुल्कर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की, चित्रपटांमध्ये काम करणे हे श्रेयासाठी स्वप्न पूर्ण होण्यासारखं आहे. अलीकडेच, 'कर्ली टेल्स' या यूट्यूब चॅनलला दिलेल्या मुलाखतीत, अभिनेत्रीनं तिच्या स्ट्रगलच्या दिवसांबद्दल सांगितलं. अभिनेत्रीनं सांगितले की, तिचा पहिला चित्रपट साइन करण्यापूर्वी ती बेघर होणार होती, ती उपाशी राहून दिवस काढायची.


आणखी वाचा : Salman - Shahrukh विसरा 'हे' असणार रिचा चड्ढा आणि अली फजलच्या लग्नात VVIP पाहुणे!


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

श्रेया म्हणाली, 'माझा पहिला चित्रपट येण्यासाठी मला जवळपास 10 वर्षे लागली. मला ते कसं मिळालं ते विचारू नका. ते कसं घडलं ते मला देखील माहित नाही. इतकंच काय तर या ठिकाणी मी कशी राहू शकले हे मला माहित नाही. माझ्याकडे पैसे नव्हते, राहायला जागा नव्हती. खूप वेळ उपाशी रहायचे, मी हे कसं केल ते मला माहित नाही.' (Sunny Deol actress from chup movie shreya dhanwanthary reveals she was homeless before her first movie ) 


आणखी वाचा : गाय-वासराला लागली पाणी पुरीची चटक, Video Viral


 

 

 

 



 

 

 

 

 

 

 

 

 

 

 

 


आणखी वाचा : महाराष्ट्राची लिसा ताई ते बिहारची Lisa देवी, मोनालिसाचा इंडियन मेकओव्हर पाहिलात का?


 श्रेया पुढे असं ही म्हणाली की 'तिला इंडस्ट्रीत स्थान मिळालं यावर तिचा विश्वास बसत नाही. चित्रपटात काम करणं हे माझं स्वप्न होतं. मी या विषयी गुप्तता ठेवली कारण मला वाटलं की माझ्यासारख्या लोकांना हे स्वप्न साकार करणं शक्य नाही. मी इथे आहे यावर माझा विश्वास बसत नाही.'


आणखी वाचा : MMS लीक झाल्यानंतर 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोराचा, बेड रूम फोटो लीक


श्रेयाच्या 'चूप' या चित्रपटाला प्रेक्षकांची पसंती मिळत आहे. 'चूप' ची कथा एका सिरीयल किलरवर आधारित आहे, ती व्यक्ती चित्रपट समीक्षकांची हत्या करते आणि त्यांच्या मृतदेहाला स्टार रेटिंग देते. 'चूप'मध्ये दुल्कर सलमान एका चित्रपट निर्मात्याच्या भूमिकेत दिसत आहे, तर सनी देओल सीरियल किलरला पकडण्याऱ्या पोलिसाच्या भूमिकेत आहे. या चित्रपटात श्रेया रिपोर्टर बनली आहे. 'चूप' बॉक्स ऑफिसवर चांगला काम करत आहे. श्रेयाबद्दल सांगायचं तर, या चित्रपटापूर्वी ती  'स्कॅम 1992' या वेब सिरीज तर नेटफ्लिक्सच्या 'लूप लपेटा' या थ्रिलर चित्रपटात दिसली होती.