गाय-वासराला लागली पाणी पुरीची चटक, Video Viral

हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड Viral झाला आहे. 

Updated: Sep 26, 2022, 05:42 PM IST
गाय-वासराला लागली पाणी पुरीची चटक, Video Viral  title=

मुंबई : देशभरात लम्पी व्हायरस (Lumpy Virus) पसरत आहे. राजस्थान, हरियाणासह अनेक राज्यांमध्ये या विषाणूमुळे हजारो गायींचा मृत्यू झाला आहे, तर अनेक गायींना या विषाणूची लागण झाली आहे. या विषाणूमुळे गायींच्या मृत्यूची आकडेवारी अत्यंत चिंताजनक आणि दुःखद आहे. गायीच्या या बिघडलेल्या अवस्थेबद्दल लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून व्यथाही व्यक्त करत आहेत. तर दुसरीकडे गायीचा एक (Caw Funny Video)मजेशीर व्हिडीओ व्हायरल होतं आहे. 

आणखी वाचा : महाराष्ट्राची लिसा ताई ते बिहारची Lisa देवी, मोनालिसाचा इंडियन मेकओव्हर पाहिलात का?

सोशल मीडियावर रोज एक ना एक व्हिडीओ व्हायरल होताना दिसतो. (Trending Videos) फक्त माणसं खाण्यापिण्याचे शौकीन असतात असं नाही तर प्राण्यांनाही काही गोष्टी खायला आवडतात. (Funny Animal Viral Video).  असाच एक फनी व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. हा एका गायीचा व्हिडीओ आहे. या व्हिडीओत गाय तिच्या वासरूसोबत पाणी पूरीचा आस्वाद घेत आहे. हा व्हिडीओ पाहूण सगळ्यांचा आश्चर्य होतं आहे. (Trending Video) 

आणखी वाचा : MMS लीक झाल्यानंतर 'कच्चा बादाम' फेम अंजली अरोराचा, बेड रूम फोटो लीक

आणखी वाचा : विवाहित असूनही अभिनेत्रीं दुसऱ्या पुरुषावर भाळल्या....; यादीतलं चौथं नाव धक्कादायक

व्हायरल व्हिडिओमध्ये दिसत आहे की, एक गाय आणि तिचं वासरू हे चारा नाही तर चक्क पाणी पूरी खात आहे. पहिली पाणी पुरी ही गाय खाते आणि त्यानंतर दुसरी पाणी पुरी तिचं वासरू खाताना या व्हिडीओत दिसत आहे. हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. यावरून पाणी पुरी हा एक असा पदार्थ आहे ज्याचा मोह फक्त माणसांना नाही तर प्राण्यांनाही आहे. (Viral Video Of Cow Seen Eating Paani Puri Or Golgappas with Her Calf Video Went Viral Netizens in Awe Of This Scene Trending Video 2022)

आणखी वाचा : वजनावर विनोद करणाऱ्या सुत्रसंचालकावर संतापली विशाख सुभेदार, म्हणाली... 

व्हायरल व्हिडिओ @ipskabra या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ दिपांशू काब्रा यांनी शेअर केला आहे. आतापर्यंत या व्हिडिओला 2 लाखा पेक्षा जास्त व्ह्युज मिळाले आहेत.  त्याचबरोबर या व्हिडिओवर हजारो कमेंट्स आहेत. एका नेटकऱ्यानं कमेंट केली की व्वा, पाणी पुरी सगळ्यांनाच आवडते आहे. दुसर्‍या नेटकरी म्हणाला, अरे व्वा, हा व्हिडीओ पाहून मला खूप मजा आली!